शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात हेलिपॅड उभारणीत अडचणींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:13 IST

लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. गोंदिया जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागेची शोधाशोध करावी लागत आहे.

ठळक मुद्देजागेची शोधाशोध : भात खचरे आणि शेतीचा आकार लहान, गावात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. गोंदिया जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागेची शोधाशोध करावी लागत आहे. भात खचरे आणि शेतीचा आगार लहान असल्याने हेलिपॅड उभारणीत समस्यांचा डोंगर उभा आहे.निवडणुकीच्या काळात वेगाने प्रचार करता यावा यासाठी प्रत्येक पक्ष हेलिकॉप्टर दौऱ्यांचे नियोजन करतात. जिल्ह्यातही दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ होताच अनेक पक्षांचे नेते हेलिकॉप्टरने जिल्ह्यात दाखल होतील. या दौऱ्यांसाठी हेलिपॅड आवश्यक असते. सभेच्या आसपास हेलिपॅड तयार केले जाते. त्यावर नेत्यांचे आगमण होते.हेलिपॅड आवश्यक जागा धोरण २५ जानेवारी २०१८ नुसार ५४२ मीटर बाय ५२ मीटर अशी हेलिपॅडसाठी जागा आवश्यक आहे. वृक्ष आणि वीज खांब असलेल्या परिसरात हेलिपॅड तयार करण्यासाठी प्रशासन परवानगी देत नाही. हेलिपॅड व हेलिकॉप्टरसाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक काळात जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांना परवानगीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यांच्याकडे तीन दिवस आधी अर्ज करावा लागतो. त्यात संपूर्ण तपशील संबंधित पक्षाला द्यावा लागतो. त्यानंतर बांधकाम विभागातून जागेचा अहवाल आणि पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षात्मक अहवाल आल्यावर परवानगी दिली जाते.मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात हेलिपॅडसाठी आदर्श जागा अत्यंत कमी आहे. भाताचे खचरे आणि शेतीचा आकार लहान आहे. तर अनेक ठिकाणी शेतात वीज खांब आहेत. त्यामुळे परवानगी देताना प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शासकीय जागांवर झुडपी जंगल आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या अशा जागांची पूर्व परवानगी घ्यावी लागते.शहरालगत पूर्वी मोकळ्या जागेवर हेलिपॅड तयार केले जायचे परंतु आता तेथेही घरे झाले. त्यामुळे हेलिपॅडची परवानगी कशी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीतच जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागा शोधताना बरेचदा अडचण निर्माण होत असल्याचे बोलल्या जाते.अशी घ्यावी लागेल परवानगीनिवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांना त्यांचे स्टार प्रचारक, महत्वाचे नेते यांना प्रचारासाठी आणताना हेलिकॉप्टर व हेलिपॅडसाठी परवानगी घ्यावी लागेल. हेलिकॉप्टरने किती प्रवासी प्रवास करणार आहे, उतरण्याची व उड्डाणाची वेळ, जागेचा सातबारा, लांबी-रूंदी दर्शक नकाशा, जमीन मालकाची संमत्ती आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. हेलिपॅड व हेलिकॉप्टरच्या संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. हेलिपॅड व हेलिकॉप्टरवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखविणे अनिवार्य आहे.-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी,