शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅम्पपेपर अभावी पीक कर्ज उचलण्यास अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकेतून पीक कर्जाची उचल करु न खरीप हंगाम करण्याची तयारी करीत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’चा परिणाम : लेखी आदेश न मिळाल्याने समस्या

राजीव फुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू असल्याने स्टॅम्प पेपरची विक्री सुद्धा बंद आहे. स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांनी स्टॅम्प पेपर विक्रीचे तोंडी आदेश दिले आहे. मात्र त्याचे लेखी आदेश न मिळाल्याने स्टॅम्प पेपर विक्रेत्यांनी अद्यापही स्टॅम्प पेपरची विक्री सुरू केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यात अडचण जात आहे.सध्या सर्वच बँकांनी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यास सुरूवात केली आहे. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागते. यासाठी शेतकरी स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी तहसील कार्यालयात जात आहे. मात्र ‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकेतून पीक कर्जाची उचल करु न खरीप हंगाम करण्याची तयारी करीत आहे.शासनाने संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कृषी विषयक कामांना सुट दिली आहे. तसेच ‘लॉकडाऊन’चा शेतकºयांना फटका बसणार नाही याची काळजी शासनाकडून घेतली जात आहे. मात्र शेतकºयांना स्टॅम्प पेपर, सातबारा इतर कागदपत्रांसाठी तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. येथील शासकीय कामे बंद असल्याने स्टॅम्प व्हेंडर सुद्धा स्टॅम्प पेपर विक्र ीसाठी तहसीलदारांचे लेखी आदेश नसल्याचे सांगत स्टॅम्प पेपरची विक्र ी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्जाची उचल करण्यात अडचण जात आहे. तरी जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेऊन स्टॅम्प पेपर मिळण्याची शेतकºयांची अडचण दूर करावी अशी मागणी केली जात आहे.शेतकºयांना पीक कर्जापासून वंचित ठेवता येत नाही. स्टॅम्प पेपर विक्र ेत्यांना स्टॅम्प पेपर विक्र ी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करु न स्टॅम्प पेपरची विक्र ी करावी. शेतकºयांना शासकीय दरात स्टॅम्प पेपर उपलब्ध करु न द्यावे.- दयाराम भोयर, तहसीलदार आमगाव.तहसील कार्यालयातून स्टॅम्प पेपर विक्र ीचे कुठलेही लेखी आदेश मिळाले नाही. राज्यात बहुतेक ठिकाणी स्टॅम्प पेपर विक्री करताना व्हेंडरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळेच जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत यातील तिढा सुटणार नाही.- स्टॅम्प पेपर विक्र ेता संघ, आमगाव.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज