शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
4
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
7
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
8
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
9
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
10
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
11
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
12
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
13
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
14
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
15
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
16
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
17
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
18
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
19
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
20
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; कोरोनाशी दोन हात 'असेही'; गोंदियातील ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:09 IST

कोरोनाशी अवघे जग वैज्ञानिक पद्धतीने टक्कर देत असताना, गोंदिया जिल्ह्यातल्या लहानलहान खेडेगावांमधले नागरिक मात्र 'त्यांच्या' पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी झटत आहेत.

ठळक मुद्देविश्वास व अविश्वासाच्या दरम्यानचे गूढ

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: कोरोनाशी अवघे जग वैज्ञानिक पद्धतीने टक्कर देत असताना, गोंदिया जिल्ह्यातल्या लहानलहान खेडेगावांमधले नागरिक मात्र 'त्यांच्या' पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी झटत आहेत.इथे कोणाला क्वारंटाईन व्हावे लागत नाही की, तोंडाला मास्क लावून बसावे लागत नाही. इथे काही वेगळेच केले जात आहे.गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेशच्या बालाघाटला लागूनच आहे. याच सीमेवर, गोरेगाव तालुक्यात असलेल्या गौरीतुला येथे राहत असलेल्या एका स्त्रीला स्वप्न पडले की, पाटा व वरवंटा यांची पूजा करा, मग तुम्हाला कोरोना होणार नाही अशा आशयाचे. तिने ते जवळपासच्या लोकांना सांगितले. यात पाटा हा दक्षिण उत्तर दिशेने पालथा ठेवून त्याला फुले वहायची होती. तिथे दिवाही पेटवायचा होता. मग वरवंटा त्या पाट्यावर उभा ठेवायचा होता. आपण सारे जाणतोच, की वरवंटाच्या दोन्ही बाजू या गोलाकार असतात. असा हा गोलाकार असलेला भाग पाट्यावर उभा करणे अशक्य असताना तसे घडत असल्याचे गावकऱ्यांनी अनुभवले व त्यांचा या कृतीवर विश्वास बसला आणि ही वार्ता वाºयासारखी इतर गावांमध्येही पसरली आणि तिथेही पूजा सुरू झाली. पाटा वरवंटा पूजा असे त्याचे नामकरणही झाले. ही पूजा सध्याही गावोगावी केली जाते आहे. गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, गौरीटोला, गोदिया तालुक्यात सावरी, तिरोडा तालुक्यात चांदोरी, बालाघाट जिल्हातील बांदरी भोपाल येथे पाटावरवंटा उभा करण्याचा प्रयोग करण्यात आले व त्याची पूजा करण्यात आली. सदर प्रयोग उत्तर-दक्षिण दिशेला बसून पाट्याच्या दोन्ही दिशेला दिवे लावून भगवान महादेव चे नाव घेत करण्यात आला. विशेष म्हणजे घरातील प्रत्येकानी वरवंटा उभा करण्याचा प्रयत्न केला पण सर्वांना उभा करता आला नाही. 

 सध्या गोंदियात एक कोरोनाबाधित रुग्ण असून ७६ जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवलेले आहे.  

 

याच दरम्यान अजून एक वेगळा उपचार तेथे केला जाऊ लागल्याचे वृत्त आहे. घरोघरी असलेल्या तुळशी वृंदावनात तुळशीच्या रोपट्याखाली कोळसा सापडतो अशी चर्चा गावात सुरू झाली. या कोळशाला पाण्यात ठेवून ते पाणी घोटभर प्यायल्यास कोरोना होत नाही. त्या पाण्याचा शिडकाव घरभर केल्यास घर सुरक्षित राहते आणि त्या कोळशाचा टिळा कपाळी लावल्यास कोरोना होत नाही असाही एक विश्वास येथील गावकऱ्यांमध्ये अलीकडे दिसतो आहे. टिळा लावलेले गावकरी येथे पहावयास मिळत आहेत.या कृतींना श्रद्धा म्हणावे की अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोरोनाशी दोन हात करताना, तिथे 'ती' कृती फक्त प्रयत्न एवढीच म्हणून शिल्लक उरते एवढेच.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस