शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धानमळणी यंत्राने संगीताला दिली आर्थिक साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:51 IST

घरी पाच ऐकर शेती असल्यामुळे रोवणी, कापणी व मळणी यासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे शेतीकामात खूप अडचणी येत होत्या.

ठळक मुद्देअवनी स्वयंसहायता महिला बचत गट : शेतीकामात उद्भवणाऱ्या अडचणींवर केली मातआम्ही स्वयंसिद्धा-४

आॅनलाईन लोकमतगोंदिया : घरी पाच ऐकर शेती असल्यामुळे रोवणी, कापणी व मळणी यासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे शेतीकामात खूप अडचणी येत होत्या. मात्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य व अवनी बचत गटामुळे सालेकसा तालुक्याच्या पांढरी येथील संगीता हरिकिशन गिरिया यांनी धान मळणी मशीन घेवून शेतीकामात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात केली. तसेच गावातील इतर शेतकरीसुद्धा सदर मशीनचा उपयोग करीत असल्यामुळे संगीता यांना नवीन व्यवसाय मिळून नफासुद्धा होवू लागला.पांढरी येथे सर्व समाजाचे लोक राहतात. सर्वांच्या घरी थोड्याफार प्रमाणात शेती आहे. मजुरीचे काम सर्व लोक करीत असल्यामुळे गावात मजूर वेळेवर मिळत नाही. गावात विकास ग्रामसंस्था असून या ग्रामसंस्थेला एकूण २२ गट जुडलेले आहे. यापैकी अवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव असलेल्या संगीता यांच्याकडे पाच एकर शेती आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने त्यांना रोवणी, कापणी व मळणी यासाठी मोठीच समस्या निर्माण होत होती.अवनी गटाला सप्टेंबर महिन्याला १५ हजारांचा फिरता निधी जमा झाल्यानंतर गटाने सीआयएफ (सामुदायिक गुंतवणूक निधी) ६० हजार रूपयांची मागणी केली. संगीता यांनी सीआयएफ कर्ज घेवून धानमळणी मशीन घेण्याचे ठरविले. त्याबाबत ग्रामसंस्थेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गटाच्या अध्यक्ष कुंती वाल्मिक माहुले यांनी अवनी गटाला ६० हजार रूपये देण्यासाठी सर्वानुमते सभेत मंजुरी दिली. अवनी बचत गटाने सीआयएफ ६० हजार व फिरता निधी १५ हजार असे एकूण ७५ हजार रूपये गटामध्ये जमा झाले. सदर गट नवीनच असल्यामुळे बचत थोडी कमी होती.त्यामुळे सीआयएफमधून कर्ज घेवून धानमळणी मशीन खरेदी करण्याचा विचार केला. तसेच ३० सप्टेंबरला त्यांनी धानमळणी मशीन खरेदी केली. यात सीआयएचचे ६० हजार रूपये व स्वत: घरून काही पैसे लावले. त्यानंतर गावात धानमळणी करण्यास त्यांनी सुरूवात केली.गावात एक नवीन मशीन आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. मशीनद्वारे धान मळणी करण्यासाठी सर्व तयार झाले. संगीता यांनी सर्वप्रथम स्वत:च्या शेतात धानमळणीने सुरूवात केली. नंतर त्यांचे काम बघून गावातील सर्वांनीच मशीनने धान मळणीची ईच्छा व्यक्त केली.सर्व शेतकरी महिलांनी धान मळणीसाठी मशीनने सुरूवात केल्यामुळे संगीता यांना नवीन व्यवसाय मिळाला व त्यात त्यांना नफा होवू लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.१५ सदस्यांचे अवनी बचत गटसालेकसा येथून सात किमी अंतरावर पांढरी गाव आहे. त्यात एकूण २१२ कुटुंब संख्या आहे. ग्रामसंस्थेत एकूण २२ गट असून अवनी स्वयंसहायता महिला बचत गट एक आहे. या गटाची स्थापना १६ मार्च २०१७ असून एकूण सदस्य संख्या १५ आहे. संगीता गिरीया हे अवनी गटाचे सदस्य असून त्यांना शेतीकामात येणाºया अडचणीमुळे व गावात धान मळणी यंत्र नसल्यामुळे सदर यंत्र घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.