शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाच्या विकासात पडणार भर

By admin | Updated: February 13, 2017 00:21 IST

अनेक विकास कामांमुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापलट होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.

फलाटांची वाढणार लांबी : नवीन वेटिंग हॉलसह अनेक सुविधा गोंदिया : अनेक विकास कामांमुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापलट होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. होमप्लॅटफॉर्मवर नवीन शेडचे बांधकाम तर पूर्ण झालेच, आता लिफ्ट व एस्कलेटरच्या कामांनाही गती मिळाली आहे. शिवाय आता नवीन वेटिंग हॉलसह प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक विकास कामे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पूर्वी गाडीचे २४ कोच थांबू शकतील, एवढी लांबी फलाटांची होती. मात्र आता नव्याने सर्वच फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. गोंदिया रेल्वे स्थानकात २४ कोचऐवजी २६ कोच थांबू शकतील एवढी लांबी फलाटांची वाढविण्यात येणार आहे. फलाट-३ वर असलेल्या वेटिंग हॉलला मोठे करून त्याला पूर्णत: वाताणुकूलित करण्यात येणार असून क्लॉस-१ च्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. तर येथेच आणखी एक नवीन वेटिंग हॉल बनणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहे. फलाट-१ वर दोन लघुशंका घर बनणार आहेत. तर फलाट-२ च्या लांबीकरणाचे कार्य सुरू आहे. फलाट-२, ५ व ६ वर वॉशेबल अप्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिवाय रेल्वे बोर्डाने गोंदियाच्या स्थानकावर किड्स झोन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जागेचा शोध घेवून स्थळ निश्चित करण्याचे कार्य सुरू आहे. या किड्स झोनमध्ये प्रवासी आपल्या लहानमुलांना खेळण्यासाठी सोडून निश्चिंत राहू शकतील. तसेच नागपूर ते काचेवानीपर्यंतची स्थानके आॅटोमेटिक करण्यात आली आहेत. आता गोंदिया ते गुदमा आॅटोमेटिक करण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून अधिक प्रवासी गाड्या धावू शकतील, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोंदियासाठी लोको मोटीव्ह इंजिनच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून ते कोठून प्राप्त केले जाईल, या दिशेने प्रयत्न केले जात आहे. नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या होमप्लॅटफॉर्मवरून सुटण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र अद्यापही त्या प्रक्रियेला सुरूवात झाली नाही. होमप्लॅटफॉर्मवर आणखी एक बाथरूमची सोय केली जात आहे. गोंदिया स्थानकाच्या फलाट-५ व ६ वर कँटिनची सोय करण्यात येणार आहे. मागील वर्षी जून महिन्यात मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांची सभा गोंदियाच्या रेल्वे व्यवस्थापक सभागृहात झाली होती. त्यात तिसऱ्या टॅ्रकबाबत त्यांनी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, गोंदियापर्यंत तिसऱ्या ट्रॅकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मात्र आता फेब्रुवारी महिना सुरू असूनही तिसऱ्या ट्रॅकचे काम राजनांदगावपर्यंतच झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियोजनानुसार कामात गती नसल्याचे म्हणता येईल. तिसऱ्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले तर अधिक रेल्वेगाड्यांना योग्यरित्या संचालित करणे सोयीचे ठरेल.(प्रतिनिधी)