शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कचारगड यात्रेची उत्साहात सांगता

By admin | Updated: February 15, 2017 01:56 IST

कचारगड देवस्थान समितीचे सक्रिय सहभाग तसेच त्यांना शासन-प्रशासनस्तरावर मिळणाऱ्या पुरेपूर योगदानामुळे पाच दिवसीय

शासन-प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य : पाच लाखांवर भाविक व पर्यटकांची हजेरी सालेकसा : कचारगड देवस्थान समितीचे सक्रिय सहभाग तसेच त्यांना शासन-प्रशासनस्तरावर मिळणाऱ्या पुरेपूर योगदानामुळे पाच दिवसीय कचारगड यात्रा धार्मिक वातावरणात, श्रध्देच्या उत्साहात व शांततेत पार पडली. यामध्ये स्थानिक समितीला तसेच गोंडी समाजाला विविध स्वयंसेवी संघटनांनीसुध्दा पुरेपूर सहकार्य केले. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य, पाणी, भोजन व्यवस्था, येण्याजाण्याची खास सोय, निवासाची तात्पुरता व्यवस्था आदी सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवर्षी माघ पौर्णिमेला पाच दिवस चालणाऱ्या या कचारगड यात्रेला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानिमित्त देशभरातील कोणा-कोपऱ्यातील आदिवासी भाविक आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत आपल्या सुखी व समृध्द जीवनाची अपेक्षा करतात. तसेच पुढील वर्षाची प्रतीक्षा करीत निघून जातात. यंदाही येथे दरवर्षी प्रमाणे पहिल्या दिवशी पेन पूजा गढजागरण आणि आपल्या आराध्य दैवतांचे आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन व ध्वजारोहण, शंभुसेवकची पालखी व महापूजेला सुरूवात, तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्तराचा गोंडवाना महासंमेलन, चौथ्या दिवशी कोयापुनेम महारॅली, कोयापुनेम महासभा, पाचव्या दिवशी गोंडवाना महासभा आणि शेवटी महासंमेलनाचे समापन कार्यक्रम घेण्यात आले. या पाच दिवसीय कार्यक्रमात क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी विशेष पुढाकार घेऊन सर्वस्तरावर सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सतत आठ दिवस अहोरात्र एक करून प्रत्येक बाबीवर विशेष लक्ष दिले. तसेच राज्य व राष्ट्रपातळीवरील विविध मान्यवरांना येथे आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना पुरेसे यश मिळाले. त्यामुळे आयोजन समिती आणि भाविकांमध्ये नवीन उत्साह संचारला. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रत्येक कामात हातभार लावला. कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमनलाल सलाम, सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरकडे, सदस्य मनिष पुसाम, रामेश्वर पंधरे, सुरेश परते, शकुंनतला परते यांनी सतत परिश्रम घेत कचारगड यात्रा सुखाची जाओ, यासाठी दिवसरात्र एक केली. कचारगड परिसर अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त व दुर्गम भागात असूनसुध्दा आदिवासींची या ठिकाणाबद्दल अपार श्रध्दा आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रत्येक यात्रेकरूने निर्भीडपणे श्रध्दामय वातावरणात येथे येवून आपले धार्मिक अनुष्ठान पूर्ण केले. ग्रामपंचायत कोसमतर्रा येथील सरपंच पूजा वरकडे, दरेकसा येथील सरपंच सोनहतीन मडावी यांच्या पुढाकाराने स्थानिक पदाधिकारी व कर्मचारी यांनीसुध्दा भरपूर सहकार्य केले. यात जि.प. सदस्य, पं.स. सदस्य यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे.(तालुका प्रतिनिधी) पिण्याच्या पाण्याची सोय जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व इतर विविध कामासाठी पुरेपूर व्यवस्था करण्यात आली. धनेगाव येथील एका विहिरीत १० एचपीचे दोन पंप बसविण्यात आले. यात एक पंप सतत सुरू ठेवून धनेगाव आणि गुफेच्या मार्गावर पाणी पुरवठा करण्यात आला. उपविभागीय अभियंता डी.यू. तुरकर, कार्यकारी अभियंता संघपाल शेगावकर, कनिष्ठ अभियंता आशिष अडमे यांच्या देखरेखीत धनेगाव येथे ४० हजार लिटरची टाकी आणि दोन ठिकाणी पाच-पाच नळाचे स्टँडपोस्ट बसविण्यात आले. तर गुफेच्या मार्गावर २५ हजार लिटरची टाकी बसवून तीन स्टॅन्ड पोस्ट बसविण्यात आले. तसेच शौचालयाच्या ठिकाणी ५०० लिटरच्या चार टाक्या लावण्यात आल्या. ६९ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. ही योजना एका वर्षात पूर्ण करायची होती. परंतु कंत्राटदार श्याम राऊत यांनी सहा महिन्यातच पुरेशी व्यवस्था करून दिली. सुरेक्षेसह आरोग्य सेवाही तत्पर यात्रेच्या पूर्वीपासूनच जिल्हा आणि तालुका प्रशासनाने कचारगडकडे विशेष लक्ष दिले. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, सीईओ पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक भुजबळ यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार सर्व विभागांनी आपापली भूमिका यशस्वीरित्या पार पाडली . तहसीलदार प्रशांत सांगळे व त्यांचे सहकारी यांनी सतत आठवडाभर लक्ष दिले. पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. त्यामुळे केंद्रीय व राज्याचे मंत्री आणि अनेक मान्यवर येथे येऊन गेले असता सुरक्षा व्यवस्था चोख दिसून आली. तालुका वैद्यकीय अधिकारी नरेश येरणे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने आपले शिबिर लावून आरोग्य सेवा पुरविली. तसेच ग्रामीण रुग्णालय सालेकसा व काही स्वयंसेवी संस्थांनी सुध्दा आरोग्य कॅम्प लावले. तसेच फिरते आरोग्य केंद्रसुध्दा चालविण्यात आले. मोफत भोजनदानात अनेकांचे सहकार्य दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना मोफत भोजनदान देण्यासाठी आ. पुराम यांच्या मार्गदर्शनात अनेकांनी नि:स्वार्थ भावनेने भरभरून सहकार्य केले. त्यामुळे सतत चार दिवस व रात्री भोजनदान कार्यक्रम चालला. यात कुणी तांदूळ, कुणी भाजीचे, किराना व अर्थ स्वरूपात मदत केली. मदत करणाऱ्यांमध्ये नाशिक येथील दिनकर जगदाळे, देवरीचे भरत दूधनाग, तुषार वाघ, छत्तीसगडचे वडेट्टीवार, मन्नेलाल आचले, राधेश्याम टेकाम, मनोज इळपाते, हनुवंत वट्टी, विरेंद्र उईके, मोहन बीबीनाहके, गोलू टेकाम, मुन्नालाल टेकाम, प्रशांत उईके, अरविंद सोयाम, ब्रिजलाल उईके, गुलाब धुर्वे, राजेश वट्टी आदीचे सहकार्य लाभले. भोजन वाटप करण्यासाठी जबलपूर, बालाघाट, बालोद, चांदागड आणि सालेकसा येथील आदिवासी विद्यार्थी संघाने सातत्याने सहकार्य केले.