लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ येथील डोंगरगाव डेपोच्या एका हॉटेलमध्ये देवरी पोलिसांनी धाड घालून ३४ लाख ५० हजाराचा कच्चा लोखंड जप्त केला आहे.देवरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगाव डेपोच्या रामदेवबाबा हॉटेलमध्ये अवैध पध्दतीने गौण खनिजाचा व्यापार जोमाने सुरू असल्याची माहिती मिळाली. रामदेवबाबा हॉटेलचे मालक कमरूद्दीन ट्रक चालकांकडून लोखंड खरेदी करून बाहेर पाठविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या चमूने धाड घालून ट्रक क्र.एमएच ४०/बीजी-८०४२ व ट्रक क्र.एमएच४०/बीजी-८०४५ मधून कच्चा लोखंड काढतांना रंगेहात पकडले. पहिल्या ट्रक मधून ३००६० किलो व दुसऱ्या ट्रक मधून २९७७० किलो कच्चा लोखंड जप्त करण्यात आला. दोन्ही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले.जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ३४ लाख ५३ हजार ३२० रूपये सांगितली जाते. पाचही जणांवर देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९, ४२०, ४०७, ३४, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
देवरी पोलिसांनी पकडले ३४ लाखांचे लोखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST