शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्युने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्युने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला गावाला लागून असलेल्या आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावे डेंग्युच्या विळख्यात सापडली आहेत. यात तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या वडद, सोनेखारी, कवडी, कन्हारटोला, रामपूर, अंजोरा गावात डेंग्युचे बरेच रुग्ण आढळले. तर सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सलंगटोला, चर्जेटोला येथे डेंगुचे रुग्ण आढळल्याची माहिती अहे. त्यामुळे परिसरात डेंग्यु आजाराचे तैमान सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजून काही गावे डेंग्युच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण परिसर डेंग्युमय होऊ शकतो. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली जात आहे. कोटरा गावाला वगळले तर या संपूर्ण गावाकडे आरोग्य विभागाचे सपेशल दुर्लक्ष आहे.प्राप्त माहितीनुसार, कोटरा गावातील लिलाधर क्षीरसागर, दिपाली बोहरे, मानीकचंद मानकर, सलंगटोला येथील रंजित दाते, मधू दोनोडे, ललीत दोनोडे, सोनेखारी येथील योगेश्वरी पटले, कवडी येथील आशीष साखरे, अक्षय उईके, अंजोरा येथील कांची राणे, राहुल रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, वैशाली अंबुले, तिरखेडी येथील योगेश्वरी मडावी, वडद येथील शालीकराम पारधी, रामपूर येथील उदल बहेकार, कन्हारटोला येथील रमेश तांडेकर, मुकेश ताडेकर, सुनील रहिले, बालू ब्राम्हणकर, चर्जेटोला येथील मनोहर चर्जे, वंदना चर्जे, स्वाती चर्जे, मयाराम चनाप, डेंगू सारख्या आजाराने ग्रस्त असून यातील बरेच रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती आहे.काही रुग्ण गोदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंजोरा गावातील बरेच रुग्ण गोंदिया येथील खासगी रुग्णालयात तर काही साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तापाचे प्रमाण वाढले. मात्र यात डेंगू ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जानवते. विविध रोगाने आजारी रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी डॉक्टरांची चांदी आहे. या परिस्थितीमुळे असे लक्षात येते की शासनाचे आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रोगावर आळा घालण्यास यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे लोकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)