शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा गावांत डेंग्यूचे थैमान

By admin | Updated: July 31, 2014 00:05 IST

जिल्हा जंगलाने आच्छादलेला असल्याने दरवर्षीच जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरतो. मात्र आरोग्य विभाग याकडे उदासीनता दाखवित असल्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू झपाट्याने पाय पसरत आहे.

शासकीय आकडा अत्यल्प : ३८ जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविलेगोंदिया : जिल्हा जंगलाने आच्छादलेला असल्याने दरवर्षीच जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरतो. मात्र आरोग्य विभाग याकडे उदासीनता दाखवित असल्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू झपाट्याने पाय पसरत आहे. जिल्ह्यातील राजोली, ताडगाव, सिरेगावबांध, कोरंभी, कोटरा व दवनीवाडा या सहा गावांत डेंग्यूने थैमान घातले आहे. परंतु शासकीय आकडा अत्यल्प दाखवत आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चार गावात डेंग्यूने थैमान घातले. राजोली येथील अनेक लोक आजारी पडले असून त्यांना डेंग्यू असल्याचे लक्षात आले. मात्र हिवताप कार्यालय या गावातील फक्त पाच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देत आहे. ताडगाव येथील अनेकांना डेंग्यूची लागण झाली. मात्र दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सिरेगावबांध येथेही हिच स्थिती आहे. मात्र येथीलही दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर कोरंभी येथील पाच जणांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही, असे हिवताप कार्यालयाचे म्हणणे आहे.सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथे डेंग्यूने थैमान घातल्यामुळे तेथे शिबिरही लावण्यात आले होते. या ठिकाणातील पाच लोकांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कोटरा येथे चार जणांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे तेथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी सांगितले होते. परंतु हिवताप कार्यालय सालेकसा तालुक्यात एकही डेंग्यूचा पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे सांगून आपल्या उदासिनतेची साक्ष देत आहे. गोंदिया तालुक्याच्या दवनीवाडा येथे मागील आठवड्या भरापासून डेंग्यूने थैमान घातले आहे. या गावातील लिलावती सुरजलाल माहुले (५८) रा. दवनीवाडा या महिलेचा डेंग्यूने नागपूर येथे उपचार घेताना मृत्यू झाला. व्हीकेश यादोराव भोयर (२२), अखिलेश लिल्हारे (२७) व यशोदा नागपूरे (५६) यांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु दवनीवाडा येथील सात लोकांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप डेंग्यू आहे किंवा नाही ही बाब स्पष्ट झाली नाही, असे हिवताप कार्यालयातील कर्मचारी कुंभरे यांनी सांगितले. डेंग्यूने लिलावती माहुले यांचा मृत्यू झाला. मात्र याची नोंद जिल्हा हिवताप कार्यालयात नाही. (तालुका प्रतिनिधी)