शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

समाजजीवनातील प्रदर्शन, नृत्याविष्काराची धमाल

By admin | Updated: January 15, 2017 00:15 IST

भारतीय युवाशक्ती अधिक समंजस होत असल्याचे प्रतिबिंब बोंडगावदेवी येथे आयोजित राष्ट्रीय

राज्यस्तरीय रासेयो शिबिर : बोंडगावदेवीत विविध जिल्ह्यातील तरुणाईचा अविष्कार

संतोष बुकावन  अर्जुनी मोरगाव भारतीय युवाशक्ती अधिक समंजस होत असल्याचे प्रतिबिंब बोंडगावदेवी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय शिबिरात उमटले. या शिबिरात युवक-युवतींनी समाजजीवनातील प्रदर्शनापासून ते समाज पोखरणाऱ्या स्त्री भ्रूणहत्येसारखे विषय हाताळत समाजाला ‘जागे’ करण्याचा जोरकस प्रयत्न केला. तरुणाईचा प्रचंड जल्लोष...मस्ती... पावित्र्य अन् नृत्याच्या धमाल अविष्काराने बोंडगावदेवीवासीयांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. दिवसा श्रमदानामुळे आलेला शिण रात्रीच्या जल्लोषपूर्ण मनोरंजनात कुठेच दिसत नव्हता. मॉ गंगा-जमुना देवस्थानाच्या नावाने प्रसिद्ध असलेला बोंडगावदेवीचा परिसर श्रमदानासोबतच गीत, संगीत, नृत्य आणि आदिमायेच्या गजराने उत्साह आणि पावित्र्याने न्हाऊन निघाला. राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग पेटलेल्या आणि मराठीपणाचा बाणा जपलेल्या, सळसळत्या तरुणाईच्या शिस्तबद्ध जल्लोषात या शिबिराला ९ जानेवारी रोजी सुरुवात झाली. श्रमदान तर होतच आहे, मात्र सांस्कृतिक वारसा जपून समाजाला त्या माध्यमातून संदेश देण्याचा भरकस प्रयत्न ही तरुणाई करत आहे. एकापेक्षा एक सरस लोकप्रिय हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण करुन मुंबईपासून आलेल्या या तरुणाईने उपस्थितांची मने जिंकली. भावी युवापिढीवर देशाची धुरा असताना हे आवाहन पेलण्याऐवजी आजची युवापिढी व्यसनाधिनतेकडे आकृष्ट होत आहे. भरकटत चाललेल्या या युवापिढीला वेळीच व जागरुक होण्याचा संदेश मुंबईच्या अंकिता जाधव व चमूने व्यसनमुक्ती नाटीकेतून दिला. कुष्ठरोगाबद्दलच्या अनेक गैरसमजूती समाजात आहेत. कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन या वैज्ञानिक युगात बदलला पाहिजे असा संदेश शिबिरार्थ्यांनी दिला. ‘इंद्रदरबारच्या मिसकॉल’ने तर धमालच उडविली. मार्डन नारद व वरुणदेवाची हुबेहुब भूमिका लाखांदूरच्या प्रशांत नेवारे व संचाने साकारली. दिवसेंदिवस पृथ्वीतलावर पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रदूषण वाढले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. प्रदूषणाविरोधात लढा देऊन पर्यावरण व सृष्टी वाचविण्यासाठी लढा देण्याचे आवाहन केले. निकिता रंगारी या विद्यार्थीनीने गायलेल्या ‘मेरे ढोलना सून....प्यार की धून’ या ठेकेबाज गाण््याने या राज्यस्तरीय शिबिराच्या शामियान्यात अख्खी तरुणाई बेभान होऊन थिरकली. या बहारदार गाण्यावर युवक-युवतींचा जोश बघण्यासारखा होता. या शिबिरात गीत गायनामध्ये अनेक गीतांची अमीट छाप राहिली. सोबतच भजन, कव्वाली, लावणी, एकलनृत्य, समूहनृत्य, गीतगायनाच्या बहारदार आविष्काराने अख्खा शामियाना भावविभोर झाला. भिवापूरच्या गोपाल पाटीलने सादर केलेले ‘मै कभी अंधेरे मी गीत जाऊ, मुंबईच्या अंकिता जाधवने सादर केलेल्या लावणीवर शामीयानात उपस्थित असलेल्यांना ताल धरावयास भााग पाडले. किरण बोरकरने सादर केलेल्या बाप्पा मोऱ्या या नृत्यावर अगदी धार्मिक वातावरण निर्मिती झाली. सतीश जिभकाटे, केजू चांदेकर, लोचन मेंढे, रेश्मा भाजीपाले, प्रशांत पटले, रोशन शेंडे, धर्मेश सूर्यवंशी, सुहासिनी वैद्य, सुचिता वाडेकर, तेजस्विनी जाधव, कलावती चुटे, ज्योती बोरकर, दीपीका ब्राम्हणकर, तुलसीदास राखडे, तेजस्विनी दुपारे, सारिका विश्वास, निकीता रंगारी, ज्योती भाटी, सागर निमजे, सरिता हातझाडे, कृष्णकुमार भोयर, रजन महाजन, तुषार नाकाडे, मोनिका मडावी यांच्या अभिनय प्रस्तुतीकरणाने सर्वांची वाहवा मिळविली.