बोंडगावदेवी : जवळच्या बाक्टी ग्रामपंचायतच्या एका सदस्यासाठी निवडणूक घेण्याची कोणतीही जाहीर सूचना गावात लावली नाही. त्यामुळे अविरोध निवड झालेली प्रक्रिया रद्द करून गावकऱ्यांपासून निवडणूक जाहीरनामा अलिप्त ठेवणाऱ्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी मंगेश बडोले यांनी केली.निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना केलेल्या तक्रारीनुसार, बाक्टी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.३ मधील रिक्त असलेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यासंबंधीचा जाहीरनामा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आला नाही. गावातील एका जागेच्या पोटनिवडणुकीसंबंधीची माहिती वार्डासह ग्रामस्थांना दिल्याने इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. गावात निवडणूक असताना ग्रामपंचायतला कोणतीही सूचना देण्याचे सौजन्य निवडणूक यंत्रणेने दाखविले नाही. निवडणूक संबंधीचा जाहीरनामा गावकऱ्यांना माहीत होऊ न देण्याचे कारस्थान करणाऱ्यावर कारवाई करून अविरोध झालेली ग्रामपंचायत सदस्याची निवड रद्द करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली. (वार्ताहर)
अविरोध झालेली निवड रद्द करण्याची मागणी
By admin | Updated: September 18, 2015 01:37 IST