शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

जिल्हा परिषद सदस्य उषा हर्षे यांनी समाजकल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी पेंदाम या अधिकाऱ्यांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत निधी वाटपात मोठा भेदभाव केला आहे.

निधी वाटपात गैरप्रकार : जि.प. सदस्य उषा हर्षे यांचा आरोपआमगाव : जिल्हा परिषद सदस्य उषा हर्षे यांनी समाजकल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी पेंदाम या अधिकाऱ्यांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत निधी वाटपात मोठा भेदभाव केला आहे. त्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप हर्षे यांनी केला आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यात ९ कोटी २२ लाख ५५ हजार रुपये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झाले. सन २०१३ सप्टेंबरअखेर मंजुरी प्रदान करायची होती. समाज कल्याण अधिकारी यांनी सात महिन्यापूर्वीपासून केवळ आर्थिक देवाणघेवाणकरिता मंजुरी दिली नाही. तालुक्यात ज्या १७ ग्रामपंचायतीला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मंजूर झाले. ज्या ग्रामपंचायतचा प्रस्ताव सादर झाला नाही, तरी त्या ग्राम पंचायतींना निधी मंजूर झाला. प्रस्ताव वेगळ्या दलित वस्तीचे असताना वेगळ्या दलित वस्ती मंजुरी दिली. लोकसंख्येच्या आधारे निधी वाटप जास्त करण्यात आला. सन २००७ पासून काही गावात कामे झाली नाही. मात्र अधिक निधी दर्शवून अपात्र ठरविले. काही गावातील प्रस्तावावर खंड विकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी केली नाही. ठेकेदारांनी परस्पर प्रस्ताव सादर केले. गृहत आरखड्याप्रमाणे कामे मंजूर झाली नाही. बृहत् आराखड्याच्या मंजुरी, आधीच्या चार-पाच वर्षापूर्वीच्या प्रस्तावास मंजुरी कशी? तालुक्यातील गावांना कामे मंजूर करताना पाळीपाळीने मंजूर करायचे होते. मात्र काही गावांना संलग्न दरवर्षी मंजूरी का? ग्रामपंचायत कालीमाटी येथे सन २००७ पासून कामे झाली नाही. मग मंजुरी का नाही. ज्या गावाची कामे मंजूर आहेत, कामे झाली नाही त्या गावांना दोन वर्ष नवीन कामे मंजूर करता येत नाही. परंतु पुन्हा मंजुरी कशी. २१ फेब्रुवारीच्या जि.प.च्या सर्व साधारण सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभेचा त्याग केला. सभेला सत्ताधारी पक्षाचेच सदस्य उपस्थित होते. सभेत मुद्या क्र.१ मध्ये दलित वस्ती सुधारची कामे नियम बाह्य असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पिठासन अध्यक्ष यांनी सर्व कामांना स्थगनादेश दिला. काही तालुक्यात आदेशाचे पालन करण्यात आले. २२ जानेवारीच्या शासन निकषाप्रमाणे लोकप्रतिनिधींनी सुचविलेले काम मंज़ूर करण्याचे आदेश आहेत. मात्र समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आले. आर्थिक देवाणघेवाणीमुळे अधिकाऱ्यांनी यादीला मंजुरी दिली. या आदेशाविरुद्ध हर्षे यांनी दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर गोंदिया येथे याचीका दाखल करण्यात आली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून समाज कल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांना बडतर्फे करण्याची मागणी जि.प. सदस्य उषा हर्षे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)