केशारी : शासनाकडून मिळणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, विधवा महिलांना मिळणाऱ्या पेंशन योजनेचे मानधन गरजू लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळत नसल्याने त्यांच्या समोर आर्थिक प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळीत देखील लाभधारक मानधनापासून वंचित राहिले. त्यांना दर महिन्याच्या १ तारखेला बँकेमधून मानधन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता चेतन दहीकर यांनी केली आहे.शासन तहसील कार्यालया मार्फत श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ निवृत्ती पेंशन योजना, विधवा महिलांना पेंशन योजना कार्यान्वित करुन गरजू लोकांना जगण्याचे बळ दिले आहे. या लोकहितकारक योजनांमुळे बऱ्याच गरजू मंडळीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.सदर योनजेचे मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी फार उशीर लागत असल्यामुळे रेशन घेण्यासाठी त्यांच्या जवळ पैसे उपलब्ध राहत नाही. ऐन दिवाळीच्या वेळी पण त्यांना मानधन देण्यात आले नाही असे सांगण्यात आले आहे. मानधन आले असावेत म्हणून दररोज बँकेत जाऊन चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये याकरिता शासनाने त्यांच्या खात्यावर प्रत्येक महिण्याच्या १ तारखेला योजनांचे मानधन देण्याची मागणी दहिकर यांनी केली आहे.
शासकीय योजनांचे मानधन देण्याची मागणी
By admin | Updated: November 11, 2014 22:43 IST