शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय आकाशदिव्यांना डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:10 IST

दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देरंगबिरंगी आकाशदिवे बाजारात : मध्यम रेंजला ग्राहकांची पसंती

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत. यात मात्र यंदा चायनीच आकाशदिव्यांची डिमांड घसरली असून भारीतय पारंपारीक आकाश दिव्यांना जास्त डिमांड असल्याचे विक्रेत्यांकडून कळते.प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घराच्या समोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे.नेमकी हीच बाब हेरून विक्रेते दरवर्षी आकाशदिव्यांच्या नवनवीन व्हेरायटी ग्राहकांसाठी घेऊन येतात. त्यानुसार यंदाही बाजारपेठ रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी सजलेली दिसून येत आहे.तर ग्राहकांची आतापासूनच खरेदीसाठी गर्दीही दिसून येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चांगलीच चलती असताना आकाशदिव्यांनाही आता चायनीज ज्वर चढला होता. यंदा मात्र चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी नागरिक स्वत: पुढाकार घेत असल्याने चायनीज आकाशदिव्यांना मागणी घटत चालली आहे.बाजारातील विक्रेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी, नागरिकांकडून यंदा भारतीय आकाशदिव्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे चायनीज आकाशदिवे अत्यंत कमी प्रमाणात विकले गेले.परिणामी आम्हीही भारतीय आकाशदिवेच जास्त प्रमाणात आणल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे भारतीय नागरिक चायनीज वस्तूंवर बहिष्कार करीत असल्याचा हा परिणाम आता दिसत आहे.२५- २५० रूपयांपर्यंतची रेंजसध्या बाजारात २५ रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतच्या आकाशदिव्यांची रेंज दिसून येत आहे. यापेक्षाही जास्त दराचे आकाशदिवे विक्रीसाठी आहेत. मात्र ग्राहक जास्त महाग आकाशदिव्यांची खरेदी न करता मध्यम रेंजच्या दिव्यांना पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतात. यातही आता आकाशदिव्यांत कापडांपासून तयार केलेले दिवे बाजारात आले आहेत. कापडांचे असल्याने त्यांना स्वच्छ करून नीट ठेवल्यास पुढील वर्षीही त्यांचा वापर करता येतो. त्यामुळे कागदांच्या आकाशदिव्यांऐवजी कापडांच्या आकाशदिव्यांची खरेदी ग्राहक जास्त करीत आहे.