शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील कोरोना रुग्णांसाठी नागपूर जीएमसी-आयजीएमसीत १५ बेडची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 08:09 IST

गोंदिया जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली. या भेटीत त्यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्यासोबत कोरोना उपाययोजनांवर चर्चा केली.भेटीत अग्रवाल यांनी, आजघडीला आरोग्य प्रशासन व खाजगी डॉक्टर्स आपापल्या स्तरावर संभव उपचारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र मागील ६ महिन्यांत आरोग्य प्रशासन येथे नागरिकांना वाचविण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी करू शकली नाही. शासकीय रूग्णालयांत विटामीन व आॅक्सीजन देऊन रूग्णांची प्रतिरोधक क्षमता वाढवून उपचार केले जात आहे. मात्र एंटीबायोटिक औषधांची व्यवस्था नाही. परिणामी जास्त वय असलेल्यांच्या उपचारासाठी हे पुरे नाही. खाजगी रूग्णालय भरलेले असल्याने तेथे जागा मिळणे असंभवन वाटत आहे. अशात नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसी शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये जिल्ह्यासाठी किमान १५ बेड आरक्षित करावे जेणे करून गरज पडल्यास रूग्णांना गरज पडल्यास त्वरीत जागा मिळणार असे सांगीतले.

याशिवाय, शासकीय अलगीकरण केंद्रात चांगले जेवण व स्वच्छतेचा अभाव असल्याने बहुतांश रूग्ण होम क्वारंटाईन होत असून थोड्या लापरवाहीने ते कुणाच्या संपर्कात येऊन ही महामारी पसरवीत आहे. अशात केंद्रातील जेवण व स्वच्छतेत सुधार आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच सन २०१९-२० मध्ये जिल्हा नियोजन समितीने १० कोटी हून अधिक निधी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना आधुनिक मशीन्स लावण्यासाठी दिला होता. ज्यात १२ व्हेंटीलेटर्स खरेदीसाठी अधिष्ठातांना १.४४ कोटी रूपये मिळाले होते. मात्र आतापर्यंत आवश्यक मशीन्सची खरेदी झाली नसून वाढती रूग्ण संख्या बघता जिल्हा आरोग्य प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सिद्ध होते. अशात उपलब्ध निधीतून त्वरीत मशीन्सची व्यवस्था करावी. त्याचप्रकारे नवीन सिटी स्कॅन मशीन आली असल्याने जुनी मशीन दुरूस्त करून दोन्ही मशीन सुरू करण्याची मागणी अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्याकडे केली.खाजगी डॉक्टर्सची मदत घ्याशहरात अत्याधुनिक मशीन्सने सज्ज कित्येक रूग्णालय आहेत. मात्र फक्त ३-४ रूग्णालयांमध्येच कोरोना रूग्णांचा उपचार होत आहे. यामुळे सर्व बोझा शासकीय व्यवस्था व या ३-४ खाजगी रूग्णालयांवरच येत असून व्यवस्था विस्कटत आहे. अशात जिल्ह्यातील डॉक्टर्सची बैठक घेऊन जास्तीत जास्त कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी सहमत करावे असे अग्रवाल असा प्रस्ताव अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्या पुढे मांडला. यावर मीना यांनी सर्व विषयांवर चर्चा करून त्यांची सविस्तर माहिती घेतली व त्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस