शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविताना कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:34 IST

शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली.

ठळक मुद्देवातावरण तापले : तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली.दरम्यान या प्रकारामुळे या परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शहराच्या तहसील कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन तयार करण्यात आले. या भवनासमोर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले. या अतिक्रणाला हटविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दुकानदारांनी धक्काबुक्की केली.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अनुसया जगने, सत्यशीला मोहबे व मन्नू राठोड या तिघांवर भादंविच्या कलम ३५३, १८६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रशासकीय भवनासमोर व आजूबाजूला टपºया लावून काहींनी अतिक्रमण केले आहे.विशेष म्हणजे सायंकाळच्यावेळी या अतिक्रमण धारकांजवळ खूपच गर्दी असते. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाटसरूंना त्रास सहन करावा लागतो. चहा-पान,अंडी, फळ विक्री करण्याचे काम या ठिकाणी केले जात होते. सायंकाळच्या वेळी काही लोक दारू पिऊन या ठिकाणी येत होते. त्या ठिकाणी नाश्ता करताना धिंगाणा व्हायचा.या अतिक्रणाला हटविण्यासाठी अप्पर तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्या नेतृत्वात एक चमू अतिक्रमण हटविण्यासाठी बुधवारी दुपारी गेली. दरम्यान अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत असताना सत्यशीला मोहबे व अनुसया जगने यांनी कारवाईचा विरोध केला. मन्नू ठाकूर नावाच्या व्यक्तीने त्यांना सहकार्य केले. कारवाई करण्याचे अधिकारी धाडस दाखवित होते तर अतिक्रमणधारक विरोध करीत होते. दरम्यान धक्काबुक्की करण्यात आली. यासंदर्भात मंडळ अधिकारी भेंडारकर यांनी या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली.या कारवाईच्या वेळी स्वत: ठाणेदार मनोहर दाभाडे उपस्थित होते. महसूल विभागाकडून या अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.काही लोकांनी स्वत: अतिक्रमण काढल्याचे अप्पर तहसीलदार मेश्राम यांनी सांगितले. या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे दुकानदारांमध्ये रोष आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस