शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणेचा विलंब अन कर्मचाऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:27 IST

मागील दोन तीन महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकामधून कर्जाची उचल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपोलीस कर्मचारी : घरकुलाचे स्वप्न अधुरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन तीन महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकामधून कर्जाची उचल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. उन्ह, वारा, पाऊस आणि सततच्या कर्तव्यामुळे त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना यंत्रणेच्या लेटलतीफ धोरणामुळे भूर्दंड सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा दर महिन्याचा पगार आॅनलाईन त्यांच्या बँक खात्यात १ ते ५ तारखेदरम्यान जमा केला जातो. मागील दोन तीन महिन्यापासून ५ तारखेपर्यंत पगार होत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच शाळांना सुरूवात झाली असून मुलांचे प्रवेश शुल्क, शैक्षणिक साहित्याची खरेदी, किराणा, घरभाडे व इतर दैनदिन गरजांसाठी पैशाची चणचण जाणवित आहे. काही कर्मचाऱ्यांनी मुलांचे शिक्षण, घर बांधकाम व इतर खासगी कामासाठी बँकामधून कर्जाची उचल केली आहे. बँकाकडून कर्जाची रक्कम दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते. यासाठी बँकानी ५ तारेखपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. या तारखेनंतर वेतन झाल्यास बँक कर्जाची उचल केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ५७० रुपये पेनॉल्टी चार्जेस लावीत आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून कर्जाची उचल केलेल्या कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागत आहे. पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक तयार करण्याचे काम करणारे काही कर्मचारी सुट्टीवर असल्याने व काही तांत्रीक अडचणीमुळे पगार वेळेवर जमा करण्यास अडचण होत असल्याची माहिती आहे. मात्र चूक यंत्रणेची आणि त्याचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना का असा सवाल पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.आठशे ते नऊशे कर्मचाऱ्यांना फटकाजवळपास आठशे ते नऊशे कर्मचाऱ्यांनी अ‍ॅक्सीस बँकेतून कर्जाची उचल केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत हमखास जमा होत असल्याने त्यांनी पगारातून कर्जाचा हप्ता कपात करण्यासाठी हीच तारीख टाकली आहे. पाच तारखेनंतर पगार झाल्यास बँक या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५७० दंड म्हणून वसूल करीत आहे. आधीच मोजके वेतन त्यातून बँक दंड म्हणून रक्कम कपात करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.घरकुलाचे स्वप्न अधुरेचपोलीस कर्मचाऱ्यांना घर बांधकामासाठी डीजी लोन योजनेतंर्गत कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते. यासाठी जिल्ह्यातील दीडशेवर कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले आहे. मात्र अद्यापही काही प्रकरणे मंजूर झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न अधूरेच असल्याचे चित्र आहे.काही तांत्रिक अडचणीमुळे मागील दोन महिने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर जमा झाले नाही. मात्र आता ही अडचण दूर झाली असून नियमित वेळेवर पगार जमा होईल. डीजी लोनसाठी ११० कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रे व त्रृट्या आढळल्याने ते प्रलबिंत आहेत. याची सूचना सुध्दा कर्मचाऱ्यांना दिली आहे.- दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस