शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसानंतरही तूट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:07 IST

जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देसरासरी ७४ टक्के पावसाची नोंद: बळीराजा लागला कामाला, प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शुक्रवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र जुलै महिन्याच्या अखेरी आणि आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर पिकांना दिलासा मिळाला आहे.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. दरम्यान गुरूवारी पुजारीटोला धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे बाघ नदीच्या पाणी पातळी वाढ झाली होती.शुक्रवारी केवळ या धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता.जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील वर्षी ९ आॅगस्टपर्यंत ८५ टक्के पावसाची नोंद झाली होती तर यंदा याच तारखेपर्यंत ७४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दमदार पावसानंतरही ११ टक्के पावसाची तूट कायम आहे. पुन्हा दोन तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ही तूट भरुन निघण्याची शक्यता आहे.न.प.शाळेला लागली गळतीशहरातील छोटा गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे छताला गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे कठीण झाले आहे. तर शालेय पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी सुध्दा पाणी गळत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी शाळेला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती आहे.रजेगाव पुलावरील पाणी पातळीत घटगोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव येथील बाघ नदीच्या जुन्या पुलावरुन गुरुवारी एक ते दीड मिटर पाणी वाहत होते.शुक्रवारी यात घट झाली असून पुलावरुन पाणी वाहत नव्हते.मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.घरांची पडझडजिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी घरे आणि गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे.महसूल विभागाने पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.तीन महसूल मंडळात अतिवृष्टीशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये खमारी ७९ मि.मी, परसवाडा ८०.२० मि.मी., ठाणेगाव ८५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.रोवणीच्या कामाला वेगजिल्ह्यात पावसाअभावी रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.त्यामुळे मागील आठवड्यात केवळ १६ टक्के रोवण्या झाल्याची नोंद होती. तर मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला सुध्दा काम मिळाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर