दीपेश सोनेवाने यांनी आतापर्यंत अनेक पेन्सिलच्या लिडवर मायक्रो आर्टच्या माध्यमातून निरनिराळ्या कलाकृती तयार केल्या आहेत. त्यात अनेक प्रकारचे नाव लिहिणे, सिंबॉल्स तयार करणे, महान थोर पुरुषांच्या मूर्ती तयार करणे, दुर्गा देवीची प्रतिकृती, पतंग धागा, शिवपिंड इत्यादी अनेक प्रकारच्या कलाकृती पेन्सिलच्या लिडवर तयार केल्या आहेत. त्यातूनच त्याला एका कलाकृतीसाठी एशिया बुक ऑफ रेकार्डच्या अवॉर्ड मिळाला आहे. जे जगातील नवीन सात आश्चर्याच्या वास्तू आहेत त्या सातही वास्तूंना दीपेशने एकाच पेन्सिलच्या लिडवर तयार केल्या आहेत. यात ताजमहल, चीनची भिंत, किस्तो रेदेंतोर, पेट्रा, कलोसियम, माक्सू पिक्त्सू, चिचेन इत्सा अशा सात वास्तूंचा समावेश करण्यात आला. जगातील सर्वांत मोठा म्हणजे ५९७ फूट उंच स्टॅच्यू वल्लभभाई पटेल यांचा द स्टॅच्यू ऑफ युनिटी याला जगातील सर्वांत लहान उंचीचा म्हणजे ०.७ से.मी. स्टॅच्यू पेन्सिलच्या लिडवर तयार करून एक वेगळा रेकॉर्ड तयार करण्यात आला. या अवॉर्डची वितरण अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले व सोबत जिल्हा परिषदेचे सीडीपीओ विनोदकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘एशिया बुक ऑफ रेकार्ड’ने दीपेश झाला ग्रँड मास्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST