शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

माहितीचा खजिना असलेली लोकजैविक नोंदवही समर्पित

By admin | Updated: December 23, 2014 23:06 IST

पश, पक्षी, किटक, वनस्पती यासह अन्य जैविक माहितींचा खजिना असलेली लोकजैविक विविधता नोंदवही महाराष्ट्र जैवविविधता मंडळ व जिल्हा जैविक विविधता व्यवस्थापन समितीला समर्पीत करण्यात आली.

गोंदिया : पश, पक्षी, किटक, वनस्पती यासह अन्य जैविक माहितींचा खजिना असलेली लोकजैविक विविधता नोंदवही महाराष्ट्र जैवविविधता मंडळ व जिल्हा जैविक विविधता व्यवस्थापन समितीला समर्पीत करण्यात आली. ग्राम सोदलागोंडी येथे २२ डिसेंबर रोजी यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम मुरदोली येथील जैवीक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या लोक जैवीक विविधता नोंदवहीत २६ प्रकारचे मासे, २७ प्रकारचे स्तनधार जीव, ११९ प्रकारचे पक्षी, २८ प्रकारचे फुलपाखरू, २७२ प्रकारचे वनस्पती, सात प्रकारचे सर्प, पाच प्रकारच्या छिपकली, चार प्रकारचे बेडूक यासह कृषी विभागाशी संबंधीत माहितीचा समावेश आहे. मुरदोलीची ही व्यवस्थापन समिती महाराष्ट्र जैवीक विविधता नियम २००८ नुसार तयार करण्यात आली असून राज्यातील पहिली नोंदवही तयार करणारी समिती ठरली आहे. समितीने भारतीय वन्यजीव न्यासच्या तांत्रीक निर्देशानुसार ही नोंदवही तयार केली असून यासाठी भारतीय वन्यजीव न्यासचे अनिल कुमार, प्रफुल बांभूरकर, भवभुती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, त्यांचे विद्यार्थी चंद्रकुमार पटले, तुरेंद्र लिल्हारे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोलीचे सहायक प्राध्यापक डॉ. लक्ष्मण नागपूरकर, जिल्हा कृषी उपनिदेशक अश्विनी बोमले यांच्यासह गावकरी व विशेतज्ञांचे सहकार्य घेण्यात आले आहे. ग्राम सोदलागोंदी येथे आयोजित कार्यक्रमात राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव व अतिरीक्त प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. दिलीप सिंह, जिल्हा जैवीक विविधता व्यवस्थापन समिती सदस्य सचिव व उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, व्यवस्थापन समिती मुरदोलीचे अध्यक्ष शशेंद्र भगत सचिव कृष्णकांत लिल्हारे यांच्या नेतृत्वात या नोंदवहीचे समर्पण करण्यात आले. याप्रसंगी भारतीय वन्य जीव न्यासचे वरिष्ठ निदेशक डॉ. राहूल कौल, प्रबंधक डॉ. राजेंद्र मिश्रा, वरिष्ठ सल्लागार प्रफुल बांभूरकर, जापान टाईगर एंड एलिफेंट फंडचे प्रतिनिधी व जैव विविधता मंडळाचे सल्लागार डॉ. दिलीप गुजर, प्राचार्य डॉ. भुस्कुटे, चंद्रकुमार पटले, डॉ, खुणे, डॉ. लक्ष्मण नागपूरकर, वन परिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.कदम, राऊंड आॅफीसर एस.के.जाधव, मुरदोली समितीच्या सदस्य अल्का काटेवार, उषा पिसदे व अन्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन किशोर पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शमीम अहमद, सौम्य दासगुप्ता, हिवराज राऊत यांच्यासह अन्य सदस्यांनी यासाठी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)