शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:03 IST

अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देविहिरींना बगल : विंधन विहिरींचे खोदकाम जोमात

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कलांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदल्यानंतर विहिरीतून निघणाºया मातीची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे. विहीर उभारण्यासाठी भुपृष्ठावर सुमारे ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्याकरीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो.बोअरवेलवर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र बोअरवेलचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेलमध्ये मुरतच नाही.पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत जिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व बोअरवेलमधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने बोअरवेल अधिक जास्त फूट खोदावे लागत आहे.काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटांवर वाटेल तसे मुबलक पाणी विहिरींना लागत होते. परंतु आता भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हात पंपासाठी ही जास्तीत जास्त खोदावे लागत आहे. या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरीता हाहाकार माजण्याची चिन्हे आता पासूनच दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई