शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:07 IST

आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे धानाचे उत्पादन होऊ शकले नाही.

ठळक मुद्देदेवरी व आमगाव तालुका : आमदार पुराम यांचे कृषिमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे धानाचे उत्पादन होऊ शकले नाही. या तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. या मागणीचे निवेदन आ. संजय पुराम यांनी कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांना मंगळवार (दि.१९) मंत्रालयात दिले. यावर कृषीमंत्र्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.या दरम्यान आ. पुराम यांनी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सालेकसा तालुक्यातील आदीवासींचे देवस्थान कचारगढ व हाजराफॉल (धबधबा) येथे रोपवे मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केलीे आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून दोन्ही ठिकाणी पर्यटक व भाविक लाखोंच्या संख्येत येतात. रोपवे निर्माण केल्यास येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. सदर ठिकाण महाराष्ट्राच्या महत्वाच्या पर्यटनाच्या नकाशावर घेता येतील. यासाठी आपल्या विभागाकडून सदर प्रकल्प मंजूर करुन ऐतिहासीक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.यावर सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याचे सचिव यांना तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनासुध्दा निवेदन देवून देवरी, सालेकसा, आमगाव तिन्ही तालुके तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून एमटीडीसी मार्फत हाजराफॉल व कचारगड येथे विश्रामगृह निर्माण करण्याची मागणी केली. यावर मंत्री रावल यांनी ‘ब’ वर्गाचे पर्यटन स्थळ असलेले कचारगड तसेच हाजराफॉल येथे विश्रामगृह बांधून देण्याची हमी दिली.यावेळीे आ.पुराम यांनी या भागातील विविध समस्या मार्गी परिसराच्या विकासाला गती देण्याची मागणी विविध विभागाच्या मंत्र्यांकडे केली. तसेच विविध मागण्याचे निवेदन त्यांना दिले.