शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

ध्येय ठरवा व कामाला लागा

By admin | Updated: December 4, 2015 02:05 IST

डोक्यात अनावश्यक बाबींचा कचरा साठवून गोंधळून जाण्यापेक्षा शासनाने आत्मशिक्षण करुन आपले ध्येय निश्चित करा.

शिक्षणाधिकारी नरड : विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम

वडेगाव : डोक्यात अनावश्यक बाबींचा कचरा साठवून गोंधळून जाण्यापेक्षा शासनाने आत्मशिक्षण करुन आपले ध्येय निश्चित करा. ध्येयानुसार योजना ठरवा व सुसाट वेगाने कार्याला लागा. असा गुरुमंत्र शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांत जोश भरत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शालेय विद्यार्थ्याना स्वेटर वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती पी.जी. कटरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडविकास अधिकारी मानकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश अंबुले, पंचायत समिती सदस्य निता रहांगडाले, सरपंच तुमेश्वरी बघेले, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी ठाकरे, शोभेलाल दहीकर, राजेश कावळे, संभाजी ठाकरे, शोभेलाल दहीकर, राजेश कावळे, भोजराज पटले, तिकलचंद रहांगडाले, चंदू शर्मा, विनायक बडगे, प्राचार्य टी.टी. रहांगडाले, डॉ.जी.जी. बिसेन, दानदाते, रामकुमार असाटी आदी उपस्थित होते. याप्रसंगी सभापती कटरे यांनी, जिल्हा परिषदेच्या हायस्कूलवर शिक्षकांची कमी ही बाब लवकरच इतिहासजमा होणार असून त्यादिशेने हालचाली सुरु आहेत. सदरची रिक्त पदे येत्या पंधरवाड्यात भरणार असून नववर्षापुर्वी विद्यालयाना पुरेपुर शिक्षक उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीकरिता सहा लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी प्राचार्य टी.टी. रहांगडाले यांनी, शालेय विकास उपक्रम व प्रशासनातील अडचणी विशद करुन शालेय दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी स्व. शोभेलाल असाटी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगरसेवक रामकुमार असाटी यांच्यावतीने इयत्ता ५ ते ८ च्या २४८ विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. संचालन वाय.के. नागपुरे यांनी केले. आभार पी.एस. मेश्राम यांनी मानले.