शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा ५० हजार रुपये प्रोत्साहानपर लाभ देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देमहात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : आतापर्यंत तीन याद्या प्राप्त : ४ हजार ५६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. यातंर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यातंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तर ४ हजार ५६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे.मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा ५० हजार रुपये प्रोत्साहानपर लाभ देण्याची घोषणा केली.यातंर्गत शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करुन त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जात आहे. यातर्गंत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यात सर्वाधिक १९ हजार १११ शेतकरी सभासद गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. १९ हजार १११ शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी २२ लाख २७ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सदर रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.इतर बँकाच्या २७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून आत्तापर्यंत एकूण २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतंर्गत एकूण ९० कोटी ४१ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. बँका आणि सहकार उपनिबंधक कार्यालयाला एकूण तीन याद्या प्राप्त झाल्या आहे.तिसऱ्या यादीत ३०९० शेतकऱ्यांच्या समावेश आहे. तर ४५६७ शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून या शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.७ हजार शेतकरी प्रतीक्षेतमहात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह जिल्ह्यातील एकूण २९ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी