शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

दरड कोसळून युवतीचा मृत्यू

By admin | Updated: June 18, 2014 00:16 IST

घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली.

अर्जुनी/मोरगाव : घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे वेळेवर एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे संतप्त जमावाने धुमाकूळ घातला. लेखी आश्वासनानंतर समजूत घातल्यानंतर त्या युवतीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार सिरोली येथील सिंधू गुलाब चौधरी ही मंगळवारला सकाळी आपल्या दोन मैत्रिणीसोबत घरातील सारवणासाठी खडी आणायला गेली होती. खडी काढण्यासाठी ती खड्यात उतरली. खडी काढत असतांनाच अचानक मातीचा ढिगारा तिच्या अंगावर कोसळला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर हे विना अर्जाने गैरहजर होते. येथे सिंधूवर उपचारच झाले नाहीत. त्याच अवस्थेत तिची सुमारे पाऊण तासपर्यंत मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यावेळी सिरोली व महागाव येथील हजारो महिला-पुरूष प्रा.आ.केंद्रावर चालून गेले त्यांनी डॉ. चांदेकर यांचे प्रती संताप व्यक्त केला. त्याचवेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मस्के व सरपंच रुपचंद खोब्रागडे यांनी संतप्त जमावाची समजूत घातली व त्या युवतीला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोरगाव येथे हलविले. अगदी ग्रामीण रुग्णालय परिसरात पोहोचताच त्या युवतीचा मृत्यू झाला. गावात युवतीच्या मृत्यूची वार्ता पसरताच जमाव आणखी संतप्त झाला. जोपर्यंत डॉ. चांदेकर यांचे इतरत्र स्थानांतर होणार नाही तोवर त्या मृत युवतीवर अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली. संजय गुज्जनवार यांनी जमावाला शांत केले. डॉ. गुज्जनवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचे आजच स्थानांतर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्या युवतीवर सिरोली येथे अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. माणिक बिझलवार यांचे फिर्यादीवरून अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी कलम १७४ जा.फौ. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पो.हवालदार रोशन गोंडाणे तपास करीत आहे.