शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

अपघातातील ‘त्या’ जखमी मुलाचा मृत्यू

By admin | Updated: December 29, 2014 01:35 IST

भरधाव वेगात असलेली दुचाकी झाडाला आदळून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सालेकसा : भरधाव वेगात असलेली दुचाकी झाडाला आदळून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत खोलगड येथे १९ Þडिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. अपघातातील मृत मुलाचे नाव प्रदीप दीपचंद दसरिया (१४, रा. ब्राह्मणटोला) असे आहे. कावराबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे स्नेह संमेलन असल्याने कुणाल कटरे (१४,रा.खोलगड) या विद्यार्थ्याने घरून नाट्यप्रयोगात घालण्याचे कपडे घरून आणण्यासाठी मुख्याध्यापक एन.टी.निर्वीकार यांची दुचाकी एमएच ३५/एच १५७८ मागीतली होती. यावर कुणाल कटरे व अरूण मोहारे (१४) यांना घेऊन प्रदीप कुणालच्या घरून त्याचे स्नेह संमेलनातील नाट्यप्रयोगात वापरण्याचे कपडे घेऊन शाळेत परत जात होता. मात्र खोलगड येथील वळणावर प्रदीपचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळली होती. या अपघातात कुणाल व अरूण यांना किरकोळ मार लागला होता. तर प्रदीपच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोंदियाला पाठविण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गोंदियातून नागपूरला पाठविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान २८ डिसेंबर रोजी सकाळी प्रदीपचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)