शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:43 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्धेवरुन आलेल्या पोलीस शिपायाचा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.२९) सकाळी मृत्यू झाला.

ठळक मुद्देआवश्यक सुविधांच्या अभावाचा ठरला बळी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्धेवरुन आलेल्या पोलीस शिपायाचा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.२९) सकाळी मृत्यू झाला. आवश्यक सुविधांअभावी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत पोलीस शिपायाचे नाव अशोक सोनटक्के (४५) बक्कल क्र मांक ३२१ असे आहे.प्राप्त माहितीनुसार सोनटक्के यांची गोंदिया जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली होती. अर्जुनी मोरगाव येथील बुथ क्र. १०८ बोथली येथे त्यांनी कर्तव्य बजावल्यानंतर रात्री १ वाजता ते गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात पोहोचले होते. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. गोंदिया पोलीस मुख्यालयात पोहोचल्यावर तिथे रात्री पिण्याच्या पाण्याची सोय आणि मेस बंद असल्याने त्यांना अन्न पाण्यावाचून मैदानातच राहावे लागले. २५ तारखेला गोंदियात आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले होते.  वर्धा येथील पोलिसांना घटनेनंतर साडे बारा वाजता रवानगी देण्यात आली, हे विशेष. दरम्यान, या घटनेविरु द्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अशोकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. परंतु, ज्या ठिकाणी सोनटक्के यांची ड्युटी लागली होती, त्याठिकाणी थोडीफार गैरसोय होऊ शकते. - डॉ.दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Deathमृत्यू