शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

कोरोना बाधितांच्या मृत्यूचा ग्राफ वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या दोन महिन्यातच तब्बल ९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर ७ हजारावर रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक तर होणार नाही ना अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावल्याने दिलासा मिळाला. पण मागील सात आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा दोन बाधितांचा मृत्यू : ९५ बाधितांची भर : ७४ कोरोना बाधितांनी केली मात 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र काेरोना बाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र कोरोना बाधित मृतकांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात गुरूवारी (दि.२९) पुन्हा दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा १२४ वर पोहचला आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या ग्राफ वाढत असल्याने थोडे भीतीचे वातावरण आहे.जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या दोन महिन्यातच तब्बल ९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर ७ हजारावर रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक तर होणार नाही ना अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावल्याने दिलासा मिळाला. पण मागील सात आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा थोडी वाढ झाली असल्याने जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे. गुरूवारी जिल्ह्यात ९५ नवीन कोरोना बाधित आढळले. यात सर्वाधिक ६१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव ३, आमगाव १५, सालेकसा २, देवरी ४, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव ७ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३७९८० जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८८०३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ९६३४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ३५९४३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२३१० नमुने निगेटिव्ह तर ३६३३ नमुने पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ९६३४ नमुने पॉझिटिव्ह आले असून यापैकी ८६६४ जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत ८४५ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ७२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. ४०० रुग्ण गृहविलगीकरणात  कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने घरीच गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिली जात आहे. यातंर्गंत जिल्ह्यात सध्या ४०० रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. यात गोंदिया तालुक्यात २२५, तिरोडा ५, गोरेगाव १५, आमगाव २१, सालेकसा २४, देवरी ४५, सडक अर्जुनी ६, अर्जुनी मोरगाव ५९ रुग्णांचा समावेश आहे. 

दुसऱ्या टप्प्यात १४ लाख नागरिकांची तपासणी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा जिल्ह्यात सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. यातंर्गत आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ९०० विविध आजाराचे रुग्ण आढळले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या