शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार जमीनदोस्त करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच  समता बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्तवतीने गुरुवारपासून (दि.२८) येथील जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला समाजकंटकांनी गालबोट लावले होते, हे विशेष. या आंदोलनाची दखल घेत २ दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत  जिल्हा प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोषींवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर भारतीय बौद्ध महासभा आमगावचे कार्यकर्ते योगेश रामटेके, मोरवाही येथील विजय मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम तसेच इतर समाजबांधवांनी गुरुवारपासून (दि. २८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता जिल्हा प्रशासन दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

२ महिने लोटूनही कारवाई नाहीच जिल्हा प्रशासनाने दोषींवर २ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन देत ऑगस्ट महिन्यात आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु आश्वासनांना २ महिने उलटले तरी, अद्याप जिल्हा प्रशासनाने दोषी व्यक्तींवर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान, दोषी कंत्राटदार व दंगल घडविणाऱ्यांविरुद्ध पोलीस तकार नोंदविण्यात आली. आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने मोरवाहीवासीयांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी