शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत माणसाला मयत दाखवून घरकुल केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:41 IST

गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देकोहमारा येथील प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या काराभाराप्रती गावकऱ्यांत चांगलाच रोष खदखदत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.कोहमारा येथील रहिवासी प्रमोद वामन तडोसे यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूर यादी तपासणीकरिता वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मौका चौकशीकरिता गावात येतात. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मौका चौकशी न करता घरी बसून चौकशी केल्यामुळे तडोसे यांना मयत दाखवून त्यांना मंजूर करण्यात आलेले घरकुल नामंजूर करण्यात आल्याची बाब पूढे आली आहे.संबंधित लाभार्थी पंचायत समितीत घरकुल बाबद चौकशीला गेले असता यादीत ते मयत असल्याचे नमूद दिसले. तडोसे हे आर्थिक दृष्टया कमकुवत असून त्यांना रहायला घर नसल्याने दुसºयाच्या घरी एका खोलीत आपले जीवन काढत आहे. तडोसे यांचे वॉर्ड क्र मांक ३ कोहमारा टोली येखे असून ते आता पडक्या खोलीत राहत आहे. तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना घरकुल न देता ज्यांचे मोेठे घर आहे त्यांना घरकुल मंजूर केले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मात्र गरजू-गरीब लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यात मात्र जीवंत माणसाला मयत दाखवून त्याचे घरकुल रद्द करणे म्हणजे हद्दच झाली आहे. त्यामुळे अशा या बेजबाबदार व निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन तडोसे यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.घरकुल यादीची मोका चौकशी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन तडोसे यांना न्याय देण्यात येईल.राजेश कठाणे, उपसभापती पं.स.सडक-अर्जुनीपंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. गरजू लाभार्थ्याना घरकुल हक्काने दिले पाहिजे. पण जिवंत व्यक्तीला मयत दाखवून घरकुल नामंजूर करणे ही गंभीर बाब आहे.माधुरी पातोडे, जि.प.सदस्य गोंदियासंबंधित लाभार्थ्याची चौकशी करुन घरकुल देण्यात येणार आहे. बेजबाबदार कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल.कवीता रंगारी, माजी पं.स.सभापती सडक-अर्जुनी

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती