शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मृत संगीताच्या मारेकऱ्यांना अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:04 IST

तालुक्यातील जवरी येथील नवविवाहित संगीता विजय शेंडे (२२) हिला तिच्या सासरच्या व्यक्तिंनी हुंड्यासाठी छळ करुन खून केल्याची तक्रार मृतकाचे वडील मोहनलाल हेमने यांनी पोलीस स्टेशनला

वडिलांची तक्रार : हुंड्यासाठी घेतला बळीआमगाव : तालुक्यातील जवरी येथील नवविवाहित संगीता विजय शेंडे (२२) हिला तिच्या सासरच्या व्यक्तिंनी हुंड्यासाठी छळ करुन खून केल्याची तक्रार मृतकाचे वडील मोहनलाल हेमने यांनी पोलीस स्टेशनला दाखल करताच आरोपींना अटक करण्यात आले.एप्रिल २०१३ मध्ये संगीताचे लग्न विजय शत्रुघ्न शेंडे (२५) सोबत झाले होते. परंतु लग्न झाल्यानंतर लगेच संगीताचा छळ सुरु झाला. पती विजय व कुटुंबियानी संगीतावर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार संगीताने वडीलांना सांगितला होता. त्यावर त्यांनी विजय शेंडे व कुटुंबियांची समजूत घातली होती. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही व संगीतावरील अत्याचार सुरूच होता. एवढेच नव्हे तर सासरच्यांनी संगीताला मारण्याचा कट रचला व तिला विष देऊन ठार मारल्याची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली आहे.२० आॅगस्ट रोजी संगिताला ताप असल्याचे सांगत गोंदिया येथे दाखल केल्याची माहिती पती व सासरच्यांनी संगीताच्या वडीलांना दिली. परंतु उपचाराआधिच तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर मृत संगीताचा पती विजय व कुटुंबियांनी तापाने मृत्यू झाल्याची माहिती दिली. फिर्यादी मोहनलाल यांनाशेंडे कुटुंबियांवर पुर्वीच संशय होता व त्यामुळे त्यांनी मुलीवर होणाऱ्या अत्याचारामुळेच तिने आपला जीव दिल्याची माहिती पोलीसांत दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंविच्या कलम ३०४ ब, ४९८ अ, ३४ व हुंडा प्रतिबंधक कायदा ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तर संगीताचा पती विजय शेंडे (२५) , सासरा शत्रुघ्न रामा शेंडे (५६) व सासू सरस्वता उर्फ मिराबाई शेंडे (५०,रा.जवरी) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)पत्नी पसंत नसल्यानेच अत्याचार विजय शेंडे याच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याची बाब येथे पुढे आली आहे. संगीता पसंत नसल्याने तो सतत ुतिला मानसीक व शारीरिक त्रास देत होता. विजयने स्वत:च्या जीवनातून तीला काढण्यासाठी हुंड्याचे पाठबळ घेतले. तर दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबध घडवून तीला स्विकारण्यासाठी पत्नीचा काटा काढण्याचा बेत समोर केला. त्यातुनच विजयने संगीताला शेतात फवारणी घालण्यात येणारे विषारी औषध दिल्याची माहिती पुढे आली. या विषारी औषणानेच तीचा मृत्यू झाला आहे असे तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारी विषारी औषधाची रिकामी व भरलेली बॉटल हस्तगत केली आहे.