शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहालाही सोसाव्या लागतात यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:32 IST

अर्जुनी-मोरगावचा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वैद्यकीय अधीक्षक आहेत की नाही, याचा कार्यरत कर्मचाऱ्यांना नेमका अंदाज नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव ही नित्याचीच बाब झाली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : वीज व स्वच्छतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगावचा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वैद्यकीय अधीक्षक आहेत की नाही, याचा कार्यरत कर्मचाऱ्यांना नेमका अंदाज नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव ही नित्याचीच बाब झाली आहे. रोग्यांना ताटकळत बसावे लागते. परंतु येथे तर मृताला सुद्धा यातना भोगाव्या लागतात. ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असलेला शवविच्छेदनगृह विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या बंदिस्त आवारात दोन खोल्यांचे शवविच्छेदनगृह आहे. त्याचा नियमित उपयोग होत नसला तरी तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त शवविच्छेदन गृह असणे सध्या स्थितीत आवश्यक आहे.ज्या खोलीमध्ये मृतदेह ठेवून उत्तरीय तपासणी केली जाते तो ओटा आज शेवटची घटका मोजून रक्तरंजित झालेल्या अवस्थेत दिसत आहे. विजेची फिटींग तुटून लोंबकळत आहे. खिडक्यांचे तावदान तुटले आहे.आतमध्ये वैद्यकीय अधिकारी करीत असलेली प्रक्रिया बाहेरील लोकांना दिसते अशी स्थिती आहे.येथे सर्वत्र केरकचऱ्यांचा पसारा असून आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातच स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे. बाजूच्या दर्शनी खोलीत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वेळीअवेळी त्या गृहामध्ये मृतकाची उत्तरीय तपासणी करावी लागते. तेथे कायमस्वरुपी विजेचा पुरवठा नसल्याने बरेचदा समस्या निर्माण होते.मृतदेह रात्रभर सुस्थितीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा अभाव आहे. शवविच्छेदनगृह अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आलेली दिसत आहे.शवागारात मृतदेह ठेवल्यानंतर नातलगांना कित्येक तास उत्तरीय तपासणीची वाट पहावी लागते. विविध गैरसोयींनी युक्त असलेला शवविच्छेदनगृह समस्यामुक्त केव्हा होणार, हे कळायला मार्ग नाही. तालुक्यात घातपाताच्या, संशयास्पद व आत्महत्या यासारख्या घटना नेहमी घडत असतात.मृतदेहांच्या उत्तरिय तपासणीसाठी येथे आणले जाते. त्यामुळे तालुका स्तरावरील शवविच्छेदन गृह सर्व सोयीयुक्त करुन तिथे कार्यशील स्वीपरची नियुक्ती करण्याची मागणी बºयाच दिवसापासूनची आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल