गणेश मंडळाचा उपक्रम : ‘बेटी बचाओ’ वर जनजागृतीगोंदिया : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देश्यातून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. त्या उत्सवाला आजही त्याच जोमाने राबविण्यात येत आहे. गोंदिया शहरसह जिल्ह्यात सामाजिक उत्थान,अनिष्ट चालीरितींचे समूळ उच्चाटण करण्यासाठी आता गणेश उत्सव मंडळांनी ुआता उपक्रम राबविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. गोंदियाच्या श्री अपना गणेश उत्सव मंडळाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर फक्त जनजागृतीच केली नाही तर मुलींच्या संदर्भात लोकांची मानसिकता बदलण्याचा उद्देश या मंडळाचा आहे. एका मुलीनंतर नसबंदी करणाऱ्या किंवा एका मुलीनंतर दुसरे अपत्य नको असा संकल्प घेणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. शहराच्या गणेश धाम, सुभाष बगीच्या जवळ मागील १३ वर्षापासून श्री अपना गणेशोत्सव मंडळ तयार करण्यात आला. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात येत आहे. ९ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदानासाठी तरूणांची चढाओढ होती. या मंडळाने यावर्षी बेटी बचाओ वर भर दिला. पुरूषांच्या तुलनेत मागील महिलांचे प्रमाण जिल्ह्यात कमी असल्यामुळे यावर भर देण्यात आला. मुलींच्या संदर्भात असलेली मानसिकता बदलण्यासाठी हा उपक्रम निवडण्यात आला. एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्त्री भू्रणहत्येवर आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)- सामाजिक उपक्रमात पुढाकारमंडळाद्वारे या वर्र्षी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत चुटीया येथील कन्या शाळेच्या विद्यार्थीनींना पुस्तके वाटप केली जाणार आहेत. सोबत गौशाळेला कचरा ट्रॉली देण्यात येईल. मंडळाद्वारे महिला भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येईल. मंडळाने या वर्षी सुरू केलेल्या लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत (बेटी बचाओ बेटी पढाओ) या विषयाला घेऊन भाग घेतला.कडक बंदोबस्तमंडळाद्वारे सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. संयोजक पंकज रहांगडाले, संरक्षक दीपक अग्रवाल, अमित अवस्थी, अध्यक्ष अरविंद तिवारी, कोषाध्यक्ष अभय अग्रवाल, महासचिव विवेक रहांगडाले, प्रमोद लिल्हारे, मीत अग्रवाल, उपाध्यक्ष योगी खंडेलवाल, निलेश गुप्ता, गुलशन बिसेन, सचिव अमोल वासनिक, बंटी शर्मा, समीर चन्ने, सहकोषाध्यक्ष मितेश पोद्दार, मोहन लिल्हारे, रवि अग्रवाल यांच्यासह इतर मंडळाचे सदस्य सेवा देत आहेत. मंडळातर्फे मोफत महाप्रसादाचे काम विवेक बजाज, नितेश राय व दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्याकडून केले जाते.
एका मुलीचा संकल्प घेणाऱ्या दाम्पत्याचा होणार सत्कार
By admin | Updated: September 10, 2016 00:11 IST