कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४.५० वाजता कलश स्थापन व ज्योत प्रज्वलनाने हभप वाखारे महाराज व बाळीराम पथोडे महाराजांच्या हस्ते झाली. प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम लंजे, ह.भ.प. एकनाथ किरसान, गौतम, श्रीराम बागडकर, ह.भ.प. एकनाथ मेश्राम, प्रशांत बडोले, विश्वनाथ पगाडे, ब्रह्मानंद किरसान, दुर्गा आगसे, देवलबाई आरसोडे, कृष्णाबाई शेंडे, कोमल बडोले, रवींद्र लोथे, जागेश्वर धनगाये उपस्थित होते. यानंतर रात्री सामुदायिक प्रार्थना आणि आलेल्या संतांच्या कीर्तनाने जागृती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सामुदायिक ध्यान व गावातून पालखी काढून ग्रामस्वच्छता करण्यात आली. त्यानंतर दुपारी गोपालकाला करण्यात आला. काल्याचे कीर्तन ह.भ.प. बळीराम पटोडे यांच्याकडून झाले. पाहुणे म्हणून वीणा डहारे तेढा, भीमाशंकर मुनेश्वर, प्रमिला मुनेश्वर, कोल्हाजी मेश्राम, राम किरसान, अशोक तावडे, श्रावण बोरघरे, यशवंत मेश्राम उपस्थित होते. काल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला. संचालन ट्रस्टच्या अध्यक्ष मुक्ता हत्तीमारे यांनी केले. आभार पुरुषोत्तम हत्तीमारे यांनी मानले.
खोबा येथे दत्तजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST