शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य स्पर्धेत सखींचा ‘झिंग झिंग झिंगाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:28 IST

लोकमत सखी मंचच्या तिरोडा शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त १० मार्च रोजी गजानन मंदिर सभागृह येथे ....

विविध स्पर्धा : सत्कार व सांस्कृतिक कार्यक्र मांनी केले मनोरंजन तिरोडा : लोकमत सखी मंचच्या तिरोडा शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त १० मार्च रोजी गजानन मंदिर सभागृह येथे कर्तुत्ववान सखींचा सत्कार, सखीं मंच प्रतिनिधींचा सत्कार व विविध सांस्कृतिक कार्यक्र म तसेच एकल व कपल नृत्य स्पर्धा, ऐतिहासिक महिला वेशभूषा स्पर्धा, असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात सर्व सखींसह अतिथीसुद्धा झिंग झिंग झिंगाट करत थिरकले. या वेळी कर्तुत्ववान सखी म्हणून नविनर्वाचित नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, नगरसेविका राखी गुनेरिया व ममता हट्टेवार यांचा संयोजिका ममता दुबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर माजी संयोजिका, सर्व प्रतिनिधी, स्पर्धेचे परीक्षक डॉ. प्रिया ताजने, डॉ पूनम चव्हाण, संगीता अग्रवाल उपस्थित होते. प्रास्ताविक मांडताना संयोजिका ममता दुबे यांनी, सखी मंच हे महिला एकतेचे प्रतिक असल्याचे सांगितले. राखी गुणेरीया यांनी महिलांचा विकास व सशक्तीकरण यावर विचार मांडले. ममता हट्टेवार यांनी महिला ही विविध गुणांचा एक पुंज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सोनाली देशपांडे यांनी महिलांना साहसी व स्वावलंबी होण्याचा सल्ला देत सखी मंच हे शहरातील महिलांचे सर्वोत्कृष्ट संघठन असल्याचे सांगितले. याप्रसंगी सदस्य अभियानात सहकार्य करणाऱ्या प्रतिनिधी सुनंदा भांडारकर, रूबीना मोतीवाला, मीनाक्षी जांभुळकर ,छाया मडावी, राजश्री पालांदुरकर, ममता असाटी, नीता पोद्दार, आशा कटरे, दीप्ती शाहारे ,सुवर्णा पालांदुरकर, रितू गुनेरिया, वनीता ठाकरे, हेमलता रहांगडाले, अनिता जैन, निर्मला सरोते ,मीनाक्षी ठाकरे ,दर्शना राखडे यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्र मात उपस्थित सर्व सदस्यांचा लकी ड्रॉ काढून एस. बी. गिफ्ट कॉर्नरच्या वतीने निवडलेल्या दोन सदस्यांना भेटवस्तू पारितोषिक स्वरूपात देण्यात आले. यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ऐतिहासिक महिला वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम मनिता अग्रवाल, द्वितीय मानसी खंडाते, तृतीय लता गेडाम आणि प्रोत्साहन पारितोषिक प्रीती शेंडे यांना देण्यात आले. स्पर्धेत हेमलता रहांगडाले, वनिता ठाकरे, सुनंदा भांडारकर, सुनिता कोट्टीवार, तेजेस्वरी बावणथडे, मीनाक्षी जांभुळकर, ममता असाटी, डॉ.अर्चना गहेरवार, नीलम चव्हाण व रूपाली भोयर यांनी भाग घेतला. एकल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम रितू गुनेरिया, द्वितीय शीतल राऊत व तृतीय नीलम चव्हाण आणि प्रोत्साहन पारितोषिक मनीता अग्रवाल यांना देण्यात आले. स्पर्धेत सोनाली सोंनकावले, नीता हिरापुरे, मानसी खंडाते, रीमा अग्रवाल, लीना कुर्वे, प्रीती बर्वे, पौर्णिमा गेडाम यांनी सहभाग घेतला. कपल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम डॉ. अर्चना गहेरवार आणि नीलम चव्हाण, द्वितीय अदिती उगवकर आणि श्वेता शेडके, तृतीय राणी बालकोठे व प्रीती पुडके यांना देण्यात आले. स्पर्धेत सोनाली सोनकावळे, राणी बालकोठे, प्रीती पुडके यांनी सहभाग घेतला. संचालन छाया मडावी, रेणुका खांबरे व माया तिडके यांनी केले. उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल त्यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. संयोजिका ममता दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रिया बुलचन्दानी, पूनम शर्मा, स्वाती राणे, जया खरवडे, ज्ञानेश्वरी वासनिक यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्व सखी व अतिथींच्या सामूहिक नृत्याने झिंग झिंग झिंगाट करीत कार्यक्र मची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)