शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 08:38 IST

Gondia News वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्दे लोकसहभाग १३ गावांत उपक्रमवन्यप्राण्यांची भागविली जात आहे तृष्णा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे व पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अशात वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत असतो, तर बरेचदा शिकारीचे प्रकारसुद्धा घडतात. या प्रकाराला आळा बसावा व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गोंदिया येथील सेवा संस्था मागील दहा वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता कार्य करीत आहे. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याचे कार्यसुद्धा सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. विदर्भातील व्याघ्र क्षेत्राचे एकात्मिक संगोपन आणि  विकास कार्यक्रमांतर्गत सडक अर्जुनी, उत्तर देवरी, गोरेगाव हे वनपरिक्षेत्र लागून आहे. याअंतर्गत जांभळी १ आणि जांभळी २ या बफर झाेन क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी १३ वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. सेवा संस्थेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जंगलातील जुन्या बंधाऱ्यामधील गाळाचा उपसा केला. तसेच वाहत्या नाल्यावर बंधारा तयार करून पाणी अडविण्यात आले. यामुळे पाणी अडवून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत झाली. या बंधाऱ्यामुळे आता वन्यप्राण्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसानी, शंशाक लाडेकर, अंकित ठाकूर, कन्हया उदापुरे, दुष्यंत आकरे, अभिजित परिहार हे सहकार्य करीत आहेत, तसेच स्थानिक स्तरावर हवन लटाये, नरेश मेंढे, विजय सोनवने, संतोष कोरे, बादल मटाले यांचे सहकार्य मिळत आहे.

पाणवठ्यांवर संस्थेच्या सदस्यांची नजर

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहावे, पाण्याच्या स्रोतावर त्याचा परिणाम होऊ नये, पाणवठ्यावर विषप्रयोग केला जाऊ नये, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडू नयेत यासाठी सेवा संस्थेचे सदस्य पाणवठ्याच्या क्षेत्रात नजर ठेवून असतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होत आहे.

टँकरने पाणीपुरवठा

उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या आणि जंगलातील पाणवठे कोरडे पडत असल्याने सेवा संस्थेतर्फे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणवठ्यामध्ये पाण्याची सोय केली जात आहे. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबविण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य