गोंदिया : मागील २४ तासांत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला जोमाने सुरूवात झाली आहे. परंतु आताही धरणे रिकामीच असल्याचे चित्र आहे. इटियाडोह या धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ३१८.८५ एमएम३ असून या धरणात पातळी २४९.४६ असून साठा ५९.४० एमएम३ आहे. मागील साठा १४८.७९ असून १८.६२ टक्के पाणी त्यात आहे. शिरपूर या धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता १९२.५६ एमएम३ असून या धरणात पातळी ३४३.३८ असून साठा २६.१९ एमएम३ आहे. मागील साठा ११४.०० असून १६.३९ टक्के पाणी त्यात आहे. पुजारीटोला या धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ४८.६९ एमएम३ असून या धरणात पातळी ३१६.५५ असून साठा ९.१७ एमएम३ आहे. मागील साठा २४.५६ असून २१.०७ टक्के पाणी त्यात आहे. कालीसरार या धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता २७.७५ एमएम३ असून या धरणात पातळी ३३७.७० असून साठा ३.७१ एमएम३ आहे. मागील साठा १३.८४ असून १३.३८ टक्के पाणी त्यात आहे. संजय सरोवरात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ४१०.०० एमएम३ असून या धरणात पातळी ५०९.४० असून साठा ६०.३२ एमएम३ आहे. मागील साठा १८२.५५ असून १४.७१ टक्के पाणी त्यात आहे. गोसेखुर्द या धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ७५०.०० एमएम३ असून या धरणात पातळी २४०.६० असून साठा ४१४.४५ एमएम३ आहे. मागील साठा २७५.९१ असून ३६.१५ टक्के पाणी त्यात आहे. बावनथडी प्रकल्पात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता २८०.२४ एमएम३ असून या धरणात पातळी ३३७.०० असून साठा ४२.६५ एमएम३ आहे. मागील साठा १४५.५० असून १६.७४ टक्के पाणी त्यात आहे.गोसेखुर्दचे आठ गेट उघडण्यात आले आहेत. ०.५० मीटरने ७८७ पाण्याचा विसर्ग होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
धरणे आहेत रिकामीच
By admin | Updated: July 27, 2015 02:47 IST