शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 29, 2015 01:18 IST

पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव : रोही व रानडुकरांच्या शिकारीबाबत सुधारित सूचनादेवानंद शहारे  गोंदियापिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी किती पिकांचे नुकसान केले, त्यांच्या हल्लात किती मनुष्य जखमी व कितींचा मृत्यू झाला व या सर्व प्रकरणांत किती नुकसानभरपाई देण्यात आली याची माहिती लोकमतने मिळविली. मागील दोन वर्षांत पीक नुकसान, मनुष्य मृत, जखमी व पशूधन हानी यांच्या नुकसानभरपाईवर वन विभागाने जवळपास सव्वा कोटी रूपये नुकसानभरपाई दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ जून २०१५ च्या नवव्या बैठकीत रोही व रानडुकर प्राण्यांच्या शिकारीबाबत चर्चा करून सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या. पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकरे व रोही यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलण्याबाबत आदेश जाहीर केले आहे. या आदेशान्वये सदर दोन्ही जनावरांची शिकार करण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना दिला जाईल. परंतु पीक नुकसानीची घटना होताच २४ तासांच्या आत संबंधित वनपालाकडे याची तक्रार करून पावती घेणे आवश्यक आहे. २४ तासांच्या आत परवाना दिला नाही तर अर्जदाराला परवाना दिल्याचे गृहीत धरून शिकारीची मूभा राहणार आहे.याबाबत गोंदिया वनविभागाचे सहायक उपवन संरक्षक जी. उदापुरे यांनी सांगितले की, सदर आदेशात केवळ रोही प्राण्याला समावेश करण्यात आले आहे. शिकार करण्याचा परवाना यापूर्वी दिला जात नव्हता. परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना नुकसान भरपाई पूर्वीपासूनच दिली जात होती. वन विभाग गोंदियातून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१३ ते ३० जून २०१५ पर्यंत एकूण एक कोटी २२ लाख ११ हजार ७५८ रूपयांची नुकसान भरपाई गोंदिया वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. यात सन २०१३-१४ मध्ये ३९ लाख ५६ हजार ९५० रूपये, सन २०१४-१५ मध्ये ४३ लाख ४६ हजार ६२६ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते जूनपर्यंत केवळ तीन महिन्यांत ३९ लाख आठ हजार १८२ रूपयांनी नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. यात पीक नुकसान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू व जखमी मनुष्य याशिवाय पशूधन हानीचा समावेश आहे. प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींची ५१ प्रकरणेवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ५१ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. यात १७ लाख ४३ हजार ४९७ रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. किरकोळ जखमीसाठी १५ हजार रूपये दिले जातत. जखमींचा उपचार शासकीय रूग्णालयात करावे, असे नमूद आहे. परंतु जखमींची स्थिती गंभीर असेल तर त्याला खासगी रूग्णालयात औषधोपचारासाठी नेले जावू शकते. तसेच ३० मार्च २०१३ च्या शासन आदेशानुसार गंभीर जखमी व्यक्तीला एक लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. पशुधन हानीची ७७ प्रकरणे दाखलवन विभागाने पशुधन हानीची ७७ प्रकरणे नोंद केली आहेत. या प्रकरणांमध्ये वन विभागाने सात लाख ३२ हजार ९६९ रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही कार्यवाही वर्षभर सुरूच असते.