शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दादासाहेबांना गोंदियातही आदरांजली

By admin | Updated: July 26, 2015 02:02 IST

दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता,..

गोंदिया : दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता, असे महाराष्ट्राचे नेते व दोन राज्यांचे राज्यपालपद भूषविणारे रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनामुळे गोंदियातही हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील दिग्गजांनी आणि दलित चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठीं सांगितल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी विदर्भातील दीक्षाभूमीच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची एक शाखा म्हणजे गवई होते, असाही सूर दिग्गज नेत्यांच्या तोंडातून ऐकू आला. महाराष्ट्रातील लोकांची गवई यांच्या माध्यमातून झालेली हानी मोठी आहे. ती पोकळी भरुन काढणे अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया गोंदियात उमटल्या. सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआडरा.सू. गवई अतिशय मनमिळावू वृत्तीचे होते. ते काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी चांगली दोस्ती होती. ते कधीच सत्येबाहेर राहिले नाही. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमदारांसाठी एक सोसायटी नोंदणी केली होती. त्यातून आमदारांना फ्लॅट देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यापूर्वी आमदारांची अत्यंत गैरसोय होती. आमदारांना सर्व सोयी देण्यात अंतुले व गवई यांचा फार मोठा वाटा आहे. दलित समाजाला संगठीत करून त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली. बाबासाहेबांची एक शाखा म्हणजे गवई तर दुसरी शाखा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. गवई यांनी दीक्षाभूमिचे खूप मोठे काम केले. महाराष्ट्र सरकारने दीक्षाभूमिला मदतही केली. सोसायटीत एक फ्लॅट घेण्याचा मला गवई यांनी आग्रह केला होता. परंतु मी आणि फुंडकर यांनी नकार दिल्यामुळे भाजपने नकार दिलेल्या गोष्टीवर तुम्ही जावू नका नंतर ते लोक फ्लॅट घेतील आणि तुम्ही तसेच राहाल असे गवई यांनी म्हटले होते. नेमके तेच झाले. आदिवासी, हरिजन व मागासवर्गीयांचा नेता हरपल्याने महाराष्ट्राची हाणी झाली. ते राज्यपाल असताना त्यांनी सत्ताधारी पक्षासोबत कधीच वितुष्ट येऊ दिले नाही. - महादेवराव शिवणकरमाजी वित्तमंत्री दांडग्या अनुभवाचा संसदपटू गमावलाविद्वान आणि दांडगा अनुभव असलेल्या गवई यांच्या निधनामुळे विदर्भाला सर्वात मोठे नुकसान झाले. दीक्षाभूमि निर्माण करण्यात अग्रणी भूमिका बजावणारे सामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करणारा आंबेडकरी जनतेचा थोर नेता निघून गेला. विधानसभेतील चांगला संसदपटू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याकडून मलाही अनेक गोष्टी अनुभवता आल्या अशा नेत्यांमुळे मोठी हाणी झाली.-गोपालदास अग्रवालआमदार, गोंदियामागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेतासामाजिक व राजकीय नेतृत्व करणारा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला आहे. यामुळे मागासवर्गीयांची मोठी हाणी झाली.- दिलीप बन्सोडमाजी आमदार, तिरोडाअनुभवी व जाणते कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीतून निघून गेले. त्यांच्या अनुभवासारखा दुसरा कुणी नाही. ही पोकळी भरुन निघणार नाही. नवीन फळीने त्यांचे आंदोलन पुढे नेल्यास त्यांना खरी श्रद्धांजली होईल. -सतीश बन्सोड, रिपाइं पदाधिकारी