पाच दिवसांपासून बेपत्ता : शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगोंदिया : चांदणीटोला येथील तिलकचंद नागपुरे या दूध विक्रेत्याचे पाच दिवसांपूर्वी अपहरण झाले. त्यांचा अद्याप थांगपत्ता न लागल्याने नगरिकांनी नागरा येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी काहीशी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.शनिवारी लोधी समाजाच्या ५०० लोकांनी नागरा येथील गोंदिया-बालाघाट रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको केला. काही काळ रस्ता बंद राहील्याने वहतूक खोळंबली होती. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कुमक मागविण्यात आली. चांदनीटोला येथील तिलकचंद लिल्हारे मंगळवारपासून बेपत्ता आहे. त्याचे अपहरण झल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचे काही बरेवाईट झाले असावे असा संशय त्याची पत्नी सरिता लिल्हारे यांनी व्यक्त केला आहे. हे अपहरण पुरणलाल यादव याने केल्याचा संशयही घेण्यात आला आहे.मंगळवारच्या रात्री गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार सरीताने दिली. परंतु पोलिसांनी नोंद न घेता दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. बुधवारच्या सकाळी ११ वाजता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली. परंतु पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नसल्यामुळे लोधी समाजाच्या १५० लोकांनी गुरूवारी शहर पोलीस ठाणे गाठले. तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याची जाणीव पोलिसांना झाली. पोलीसांनी पुरनलाल यादवला अटक केली. पुरनलालला न्यायालयात हजर केल्यावर त्याला ६ सप्टेंंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तिलकचंदची पत्नी सरिताने लावलेल्या आरोपानुसार तिचे पती मंगळवारी सकाळी ८ वाजता घिवारीतून दुध घेऊन गेले. मात्र घरी परतले नाही. कृष्णपुरा वार्डात दुर्गा दूध डेअरी आहे. ही दूध डेअरी त्यांचीच आहे. डेअरीसाठी इमारत भाड्याने घेतली. ही दूध डेअरी रिकामी करण्यासाठी पुरनलाल यादवकडून मागील अनेक दिवसांपासून धमकी मिळत होती. रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा घेराव करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. तिलकचंदचा पत्ता लागला नाही. शहर पोलिसांनी कलम ३६४, ५०६ अन्वये गुन्हा दखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दुग्ध विक्रेत्याचे अपहरण नागरात चक्काजाम
By admin | Updated: August 30, 2014 23:51 IST