शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

आगमनाची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी (दि.९) गोंदियात येत असल्याने शहरातील समस्त क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह ओसंडून वाहात आहे.

प्रेरणादायी क्षण : गोंदियातील क्रीडाप्रेमींना भेटण्याची आसगोंदिया : ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी (दि.९) गोंदियात येत असल्याने शहरातील समस्त क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह ओसंडून वाहात आहे. सचिनला प्रत्यक्ष भेटण्याची एक संधी मिळाली तर हा आपल्यासाठी आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण असेल, अशी भावना अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. क्रिकेट खेळाडूंना सचिनसोबत हात मिळवून एक फोटो काढण्याची संधी मिळाली तर आम्ही खा. प्रफुल्ल पटेल व आ. राजेंद्र जैन यांचे आभारी राहू, अशी उत्कटता त्यांनी व्यक्त केली. शहरातील नवीन खेळाडू डेविड शहारे, सचिन शेंडे, आशुतोष यादव, गुरपीतसिंह गुरूदत्ता, उपेंद्र थापा व हर्ष अरोरा यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. गुरपीतसिंह गुरूदत्ता नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना युनिव्हर्सिटी खेळाडू होता. गुरूपीतने विदर्श रणजी ट्रॉफी ट्रायलसुद्धा दिली आहे. तसेच हर्ष अरोरा १५, १८ व १९ वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धा खेळलेला आहे. तो विदर्भ चमूत स्टँडबॉयसुद्धा राहिलेला आहे. डेविड शहारे व उपेंद्र थापा हे दोन्ही खेळाडू अंडर १९ क्रिकेट खेळलेले आहेत. यांच्यासह सचिन शेंडे हा १५, १७, १९ व २२ वयोगटाखालील सामन्यांमध्ये खेळला आहे. सचिन तेंदुलकर यांच्यासह मिळण्याची संधी मिळेल तर तो क्षण खूप रोमांचक असेल, असे या सर्व खेळाडूंचे म्हणणे आहे. शहरातील नवीन खेळाडूंसह जुन्या खेळाडूंमध्येसुद्धा उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यात दिलीप डोये, शब्बीर अहमद, पप्पू जसानी, अ‍ॅड. निजाम आपल्या महाविद्यालयीन दिवसात कॉलेजच्या वतीने खेळले आहेत. त्यांच्या काळात २० वर्षांपूर्वी गोंदिया खूप लहान शहर होते. खेळाडूंना सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. तसेच खेळांसाठी त्यांना प्रोत्साहन देणारेसुद्धा कुणी नव्हते, असे या जुन्या खेळाडूंचे म्हणणे आहे. पप्पू जसानी यांचे म्हणणे आहे की, ते सचिनला विचारू ईच्छितात की आस्ट्रेलिया वर्ल्ड कपसाठी जी चमू गेली आहे, त्या चमूची बॉलिंग कोणत्या स्तराची आहे?सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात खा. प्रफुल्ल पटेल व आ. राजेंद्र जैन जनसंपर्कात कमतरता येवू देणार नाहीत. या दोन्ही नेत्यांनी मनात आणले तर ते शहरातील खेळाडूंना दोन मिनिटांसाठी सचिनला भेटण्याची संधी देवू शकतात. (प्रतिनिधी)