शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

नवेगावबांध येथे संचारबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे.

ठळक मुद्देना मास्क, ना शारीरिक अंत, प्रशासन कुंभकर्णी झोपेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्हा प्रशासनाने शिथील केलेल्या अटींचा गैरफायदा नागरिक घेत असून मास्क न वापरता अनेकजण खुलेआम फिरत आहेत. शारीरिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरूवारी (ता.२१) जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील असल्याचे समजते. हे सर्व रूग्ण मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून आले आहेत. असे असताना गावातील स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे. मोबाईल, किराणा, कापड, देशी दारूचे दुकान, जनरल स्टोअर्स, स्वस्त धान्य दुकान, पान व पहाच्या टपऱ्या जवळपास सर्वच बाजारपेठ खुल्लमखुल्ला सुरू आहे.गुरूवारी (ता.२१) सायंकाळी आझाद चौकात भररस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान व हातठेले यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कोरोनाचा आणखी धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.तालुका प्रशासनाचे एकमेकांकडे बोटनाका-तोंडाला मास्क किंवा रूमाल न बांधणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तरूणाई तर दुचाकीवर कधी दोघे, तर कधी तिघे बसवून फिरत नियम धाब्यावर टाकत आहे. परंतु कारवाईसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पोलीस विभाग ग्रामपंचायतकडे तर, ग्रामपंचायत महसूल विभागाकडे बोट दाखवतो. यांच्यात समन्वयाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती फक्त कागदावरच उरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या