शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण चालानवर अंकुश लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देटॅक्सीचालक संघटनेची मागणी : आमदार अग्रवाल यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, बहुतांश काळी-पिवळी व आॅटोचालक सुशिक्षित व बेरोजगार असून कशी बशी पैशांची व्यवस्था करून काळी-पिवळी व आॅटो खरेदी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना मात्र, वाहतूक नियंत्रण शाखेने अचानक एकाच मार्गावर २०-२५ वाहनांना विनाकारण चालान करून तंग करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे सर्वच वाहन चालक दहशतीत असून मानसिक तणावात असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे.विशेष म्हणजे, चालान केले जात असल्यामुळे त्यांची आर्थिक समस्या वाढली आहे. करिता वाहतूक नियंत्रण शाखेकडून विनाकारण चालान फाडण्यावर अंकुश लावण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली असून आमदार अग्रवाल यांना निवेदन दिले. यावर आमदार अग्रवाल यांनी, संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे व सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.निवेदन देताना, जिल्हा काँग्रेस वाहतूक संघाचे अध्यक्ष महेश वाधवानी, उमेश शुक्ला, गुड्डू ठाकुर, विष्णु तिवारी, शेरू मक्कड, रज्जाक खान, सचिन ठाकूर, अश्विन खोब्रागडे उपस्थित होते.अवैध बसेसवर बंदी लावासंघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्ह्यात अवैधरित्या चालत असलेल्या बसेसवर बंदी लावा, जयस्तंभ चौकात थांबून प्रवासी भरणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करा, ज्या बसेसचे परमीट नाही. त्यांना त्वरीत बंद करा, असोसिएशनच्या नियमांविरोधात चालणाऱ्या आॅटोचालकांवर कारवाई करा, बे्रक टेस्ट पासिंगची व्यवस्था गोंदिया जिल्ह्यात करा, जयस्तंभ चौकात सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजतादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना बस चालक व वाहक धक्के मारून दुसऱ्या बसमध्ये जाण्यास सांगतात. तसेच भरधाव वेगात बसेस चालवित असून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. करिता येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालTaxiटॅक्सी