शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

बागायती शेतीतून घेत आहेत लाखोंचे उत्पन्न

By admin | Updated: May 30, 2015 01:19 IST

पारंपरिक धानशेतीला बगल देत वेगवेगळे प्रयोग करण्याची हिंमत दाखवून त्यातून वळद येथील किशोर झाडू रहांगडाले यांनी समृद्ध शेतीचा मार्ग जोपासला आहे.

ओ.बी.डोंगरवार आमगावपारंपरिक धानशेतीला बगल देत वेगवेगळे प्रयोग करण्याची हिंमत दाखवून त्यातून वळद येथील किशोर झाडू रहांगडाले यांनी समृद्ध शेतीचा मार्ग जोपासला आहे. रहांगडाले यांना यासाठी महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरी उद्यानपंडित म्हणून गौरविले आहे.आपल्या शेतात बागायती शेतीतून तीन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न रहांगडाले यांनी काढले. आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी बागायती शेतीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांची शेतीपद्धत बदलून आर्थिक स्थिती मजबूत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. वळद येथील शेतकरी किशोर झाडू रहांगडाले हे सतत २५ वर्षापासून आपल्या १४ ते १५ एकर शेतीत विविध आंबे, सागवान, फणस, चिकू याची लागवड करीत आहेत. त्याच्याकडे हायब्रिड आम्रपाली, मालिका, रत्ना तर सुधारित जातीमध्ये लंगडा, दशहरी, चौसा, पायरी, निलम, तोताफल्ली, बैगनपल्ली, कजली, अरकापुनीत, अरकाअरुणा, चंबू, पपैया, निरंजन या विविध जातीच्या आंब्यांची झाडे आहेत. यातून जवळपास चार लाखांचे उत्पन्न त्यांनी यावर्षी घेतले. या उत्पन्नात आणखी भर पडली असती मात्र वादळामुळे आंब्याचा मोहोर, छोटे आंबे गळून पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याशिवाय क्रिकेट बाल, कालीपत्ती आदी चिकूची ४० झाडे असून त्यांचे उत्पन्न जवळपास ५० हजाराच्या घरात आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास ५० टक्के नुकसान झाले. बागायती शेती पलीकडे जाऊन रहांगडाले यांनी दोन एकरात दोन हजार सागवान झाडेही लावली. त्याला १० वर्षे झाली. आजघडीला त्याची किंमत २० लाख रुपये एवढी आहे. आपल्या नर्सरीतून फलरोपवाटीकेच्या माध्यमातून आंबा कलम, स्वस्त दरात ते शासन योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना पुरवितात. शेतकऱ्यांनी धान शेती कमी करुन बागायती शेती करणे गरजेचे आहे, असे आवाहन करुन धान शेतीला मजूर खर्च जास्त व उत्पन्न कमी असते. तसेच बागायती शेतीत मजूर व खर्च कमी, उत्पन्न मात्र जास्त असते, असा अनुभवत ते सांगतात.किशोर रहांगडाले यांनी आपल्या बागायती शेतात ५० मजूर कामावर ठेवले आहेत. म्हणजे ते २५ कुटुंबांचे पालनपोषण बागायती शेतीतून करतात. त्यांच्या या कार्यात भाऊ आमगाव पं.स.चे कृषी अधिकारी व महाराज बाग येथील अधिकारी गोलीवार यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत असतो. या बागायती शेतीच्या विकासात शासनाकडून विंधन विहिरीकरिता दोन लाखाची तरतूद आवश्यक आहे. रहांगडाले यांना या प्रगतीशील शेतीसाठी कृषी विभागाकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.बागायची शेतीला विम्याची गरजबागायती शेतीला विमा पाहिजे, असे रहांगडाले यांना वाटते. रत्नागिरी जिल्ह्यात जी विमा पद्धत आहे ती पद्धत या जिल्ह्यात पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी यांनी भेटी देऊन नुकसान भरपाईचा आढावा घेतला. पण योग्य अशी विमा पद्धत नसल्यामुळे नुकसानभरपाई त्या प्रमाणात मिळत नाही, असे त्यांनी सांगितले.