शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

गडचिरोलीचा सीटी-1 नरभक्षी वाघ केशोरी परिसरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 21:35 IST

सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारजणांचा बळी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील केशाेरी वनपरिक्षेत्रातील जंगलात दाखल झाला आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना हा वाघ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव वनक्षेत्रात आढळला. हा वाघ नरभक्षी असल्याने त्याच्यापासून गावकऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगावागावांत दिली जातेय दवंडीवनविभागाचा अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील सीटी-१ नरभक्षी वाघ गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव  तालुक्यातील केशोरी वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने जंगलात  असलेल्या गावकऱ्यांना  जंगल परिसरात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींनी यासंदर्भात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे पत्र दिले आहे.  त्यामुळे केशोरी परिसरात सीटी-१ नरभक्षी वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारजणांचा बळी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील केशाेरी वनपरिक्षेत्रातील जंगलात दाखल झाला आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना हा वाघ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव वनक्षेत्रात आढळला. हा वाघ नरभक्षी असल्याने त्याच्यापासून गावकऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना शनिवारी (दि.२४) पत्र देऊन सतर्क राहण्याच्या सूचना  केल्या  आहेत. तसेच लाकडे, गुरे चराई आणि इतर कामांसाठी जंगल परिसरात जाण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतने गावात दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. सीटी-१ वाघ केशाेरी वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या खरीप हंगामातील धानातील निंदण काढण्याची  कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतावरच असतात. अशात आता या सीटी-१ वाघ या परिसरात  दाखल झाल्याने शेतकऱ्यांवर शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. 

वाघासह हत्तीच्या कळपाची दहशत गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीचा कळप गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाला. शनिवारी हा हत्तीचा कळप वडेगावजवळील नदी परिसरात आढळला. हे हत्ती केशोरी वनपरिक्षेत्रात दाखल होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना सीटी-१ वाघानंतर आता हत्तीच्या कळपानेसुद्धा दहशत निर्माण  केली आहे. 

केशोरी वनपरिक्षेत्रात सीटी-१ हा नरभक्षी वाघ दाखल झाला आहे, तर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून हत्तीचा कळपसुद्धा या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून जंगल परिसरात गुरे चराई, लाकडे आणण्यासाठी व इतर कामांसाठी जाण्यास मनाई केली आहे. नागरिकांना सूचना केली आहे. - सी. व्ही. नान्हे, वनक्षेत्र सहायक केशोरी.

 

टॅग्स :Tigerवाघ