शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना डावलून बाजारात खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दिवाळी आता एका दिवसावर आली असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या जिल्हा कोरोनामुक्त आहे ही दिलासादायक बाब असली तरी ही गर्दी नियमांना डावलून होत असल्याने मात्र धोका दिसून येतो. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचे बोलले जात असल्याने हलगर्जीपणा करणे उचित नसून तोंडावर मास्क आजही अत्यावश्यक असून नागरिकांनी आता स्वत: काळजी घेणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्हावासीयांना रान मोकळे झाले आहे. हेच कारण आहे की, गणेशोत्सवापासून वाढत चाललेली गर्दी नियमांना डावलून आपल्या मर्जीने वावरत आहे. त्यात नवरात्रोत्सवापासून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली व आजघडीला बाजारात पाय ठेवायला जागाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र ही गर्दी नियमांना डावलून होत असून बहुतांश नागरिक तोंडावर मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यात शारीरिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर एखाद्या ही दुकानात होताना दिसत नाही हे विशेष. मात्र ही बाब धोकादायक असून वेळीच नियमांचे पालन व तोंडावर मास्क आजही गरजेचा आहे. 

तिसरी लाट न परवडणारी - कोरोनाच्या दोन लाटांमध्ये दोनदा लॉकडाऊन करण्यात आले असून या दोन्ही लाटांमध्ये लाखो लोकांचा जीव गेला असून अवघ्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यात आता पुुन्हा एकदा गर्दी वाढू लागली असून नियमांना धुडकावले जात आहे. अशात तिसरी लाट आल्यास मात्र हे देशाला तसेच देशवासीयांना ही परवडणारे राहणार नाही. यामुळे नियमांचे पालन हेच येणाऱ्या काळासाठी फायद्याचे राहणार आहे. लस घेणे हाच उपाय - देशात झपाट्याने होत असलेल्या लसीकरणामुळे आतापर्यंत तिसरी लाट आलेली नाही. यामुळे लस घेणे हाच एकमात्र उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लस घेणे टाळत आहेत. त्यांची हीच चूक कोरोनाला पाय पसरण्यासाठी पोषक ठरते. आता कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार