शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पर्यटकांच्या गर्दीने फुलले नवेगावबांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:23 IST

नववर्षाचे स्वागत आणि विदेशी पक्ष्यांना पाहण्याची संधी असा दुहेरी योग साधत विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटक नवेगावबांध येथे दाखल झाले होते. त्यामुळे नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देनौकाविहारासाठी रांगा : बालोद्यान व हील टॉप गार्डनला सर्वाधिक पसंती

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नववर्षाचे स्वागत आणि विदेशी पक्ष्यांना पाहण्याची संधी असा दुहेरी योग साधत विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटक नवेगावबांध येथे दाखल झाले होते. त्यामुळे नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे यंदा विदेशी पक्ष्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.नवेगावबांध येथे सुमारे ३६० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या तीन हजार एकरावरील जलाशय व सभोवतालच्या टेकड्या व वनाने आच्छादीत परिसरामुळे निसर्गरम्य वातावरणाची अनुभुती येथे अनुभवण्यास मिळते. नवेगावबांध जलाशयामुळे १९७१ ला नवेगावबांध राष्टÑीय उद्यान अस्तित्वात आले. त्यानंतर १९७१ ते १९९० पर्यंत या राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटक संकुल व त्या काळी अस्तित्वात आलेले प्राणी संग्रहालय, या परिसरातल विविध फुले व बगीच्या पर्यटकांसाठी पर्वनीच ठरत आहे. या परिसराचे सौंदर्य पाहण्याकरिता तिन्ही हंगामात येथे पर्यटकांची गर्दी असते. जून २०१७ ला स्थानिक नागरिकांनी नवेगाव फाऊंडेशनची स्थापना केली. ‘आपला गाव आपलेच सहकार्य व विकास’ ही संकल्पना राबवून मागील ३ महिन्यांच्या अथक परिश्रमातून या संकुल परिसरातील सर्व रस्ते, पदमार्ग, गार्डन सर्वप्रथम (सप्टेंबर २०१७ पासून ) स्वच्छ केले गेले. त्यानंतर हिलटॉप गार्डनमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी व विविध फुलांसह रंगीबेरंगी झाडे लावण्यात आले. पाण्याची व्यवस्था व संपूर्ण बगीचामध्ये सिव्हिल वर्क करुन गार्डनचा चेहरा मोहरा बदलविला. या बगीच्याला पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यानंतर संपूर्ण पर्यटन संकुल परिसराची स्वच्छता टिकून राहावी, यासाठी ३० कचरा कुड्यांची व्यवस्था फाऊंडेशनने केली.एवढ्यावरच न थांबता एका नव्या बालोद्यानाची निर्मिती केली. या बालोद्यानाचे वैष्ट्यिे म्हणजे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या बालोद्यानाचा आनंद घेवू शकतात, तेही नि:शुल्क. या बालोद्यानात सर्वाधिक गर्दी असते. एकाचवेळी ५० पेक्षा जास्त पर्यटक या बालोद्यानाचा आनंद घेतात.गेल्या दोन तीन दिवसांपासून नवेगावबांध येथे पर्यटकांची गर्दी वाढय्त असल्याचे चित्र आहे. नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या परिसरात आणखी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होवू शकते.नौका विहाराचे आकर्षणनौका विहारासाठी जे.टी. पार्इंटवरील सरोवर दृष्य व नौकाविहार ही पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले स्थळे आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविरत नौका विहार सुरुच असते. जलाशयावर येणारे देशी-विदेशी पक्षी पर्यटकांकरिता व पक्षी मित्रांकरिता आकर्षणाचे केंद्र आहे. सकाळी व सायंकाळी या पक्षांना अगदी जवळून पाहण्याची संधी या जलाशयावर उपलब्ध होत असते. त्यातच संकुल परिसराच्या दुसºया टोकावरील संजय कुटी व मालडोंगरी हेही पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी होते.चारही दिशेने सर्वच प्रकारच्या साधनाने तेही सुरळीत व खड्डेमुक्त रस्त्यांद्वारे या ठिकाणी पोहोचता येते. प्रशासनाने एकदा या स्थळाचे महत्व लक्षात घेवून या स्थळाचा विकास आराखडा तयार केल्यास हे पर्यटन स्थळ अधिक रोजगार निर्मिती करणारे ठरेल.व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.- अध्यक्ष नवेगावबांध फाऊंडेशनसंपूर्ण संकुल परिसराचे एकत्रीकरण करुन ते संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे दिल्यास त्याचे व्यवस्थापन योग्य होईल.-रामदास बोरकर,संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवेगावबांध