शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोच्या कामांचे ५२ कोटी अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 21:27 IST

सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याचे अद्याप देण्यात आले नाही.

ठळक मुद्देचार वर्षांचा पैसा थकीत : ४९ हजार दिवसांची मजुरी अडली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उत्थानाची कामे करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या मजूरांना त्यांच्या कामाचे पैसे देण्यात आले नाही. तसेच जी कामे करण्यात आली त्या कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे चार वर्षापासून पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे ज्यांनी काम केले त्यांचे पैसे अडून पडले आहेत. मजुरीच्या एक कोटी १२ लाख रूपयांसह साहित्याचे घेऊन गोंदियाचे ५२ कोटी रूपये अडले आहेत.बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे तसेच ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून शासनाने महाराष्ट्र शासनाच्या आमुलाग्र योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेला केंद्रातून राबविणे सुरू केले. मात्र मागील चार वर्षांपासून मजूरी व काम करण्यासाठी कंत्राटदारांना आणलेल्या साहित्याचेही पैसे चार वर्षांपासून देण्यात आले नाही. गोंदिया जिल्हा वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील पैसे शासनाने दिले. परंतु गोंदिया जिल्ह्याचे पैसे मागील चार वर्षापासून अडून आहेत.सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याचे अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे मे, जून व जुलै या तीन महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही.सन २०१६-१७ या वर्षात मजुरीचे ३७ लाख ४९ हजार रूपये, साहित्याचे ३२ लाख ८६ हजार रूपये, सन २०१७-१८ या वर्षात मजुरीचे २९ लाख ९६ हजार रूपये साहित्याचे १४ कोटी १५ लाख १६ हजार रूपये, सन २०१८-१९ या वर्षात मजुरीचे २२ लाख ७३ हजार, साहित्याचे २२ कोटी ८० लाख ७६ हजार रूपये तर सन २०१९-२० या वर्षात मजुरीचे २२ लाख ४२ हजार, साहित्याचे १३ कोटी ३२ लाख ६१ हजार रूपये असे ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये अडून पडले आहेत.रोहयोत गोंदिया माघारलादरवर्षी रोहयोत गोंदिया जिल्हा देशात अग्रस्थानी राहायचा परंतु आता नियोजन शुन्य कारभारामुळे गोंदिया जिल्हा माघारला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचे चार वर्षांपासून पैसे अडून पडले आहेत. साहित्यावर कंत्राटदारांनी जे पैसे खर्च केले ते देण्याची मागणी काही कंत्राटदारांनी केली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना