शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अधिपरिचारिका आत्महत्या प्रकरणाला निर्णायक वळण

By admin | Updated: September 8, 2016 00:24 IST

येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांनी गेल्या १२ आॅगस्टला जास्त प्रमाणात औषधीचे सेवन करून आत्महत्या केली.

वाहन चालकास अटक : ९ सप्टेंबरपर्यंत पीसीआर, गूढ उकलणारआमगाव : येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांनी गेल्या १२ आॅगस्टला जास्त प्रमाणात औषधीचे सेवन करून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्महत्येमागील गूढ कायम होते. त्यांच्या आत्महत्येसाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारीच कारणीभूत असल्याची कुजबूज होती. अखेर वाहन चालकाला झाल्याने हे प्रकरण निर्णायक टप्प्यावर आले आहे. मात्र यातील पूर्ण गूढ उकलून सर्व आरोपींना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या २५ दिवसांपासून या आत्महत्येमागील गूढ गुलदस्त्यात होते. त्यामुळे जबाबदार व्यक्तीही पडद्याआड होत्या. पोलिसांनी तपासात गती देत रुग्णालयातील वाहन चालक महेंद्र पुरूषोत्तम चुने (३६) याला अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील पूर्ण गूढ उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आमगाव तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आर.एम.गायधने कंत्राटी अधिपरिचारीका कार्यरत होत्या. रुग्णालयातील विशुध्द वातावरणामुळे त्या तणावात वावरत होत्या. यातच दि. १२ आॅगस्टला गायधने यांनी क्लोरोक्विनच्या औषधांचे अधिक सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली होती. सदर आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी करण्यात आल्याने पोलीस विभागाने प्रकरणाला योग्य वळण दिले. पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी महेंद्र पुरूषोत्तम चुन्ने (३६) रा.कन्हारटोली, सातगाव याला अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ४९८ अ, ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक प्रकरणे तेथील बिघडलेल्या वातावरणामुळे पुढे येत आहे. अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांच्या मृत्युचे गुढ पुढे आणण्यासाठी रुग्णालयातील कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत काय? याचा शोध घेणे गरजेचे आहे. रुग्णालयातील वाहन चालकाच्या अटकेने रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (शहर प्रतिनिधी)पती न्यायालयीन कोठडीतआत्महत्येमागे वेगळे कारण असले तरी मृतक गायधने यांच्या माहेरील लोकांनी पती भानुदास रामकृष्ण मुनेश्वर (३२) यांच्यावरच आरोप केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे पोलीस विभागाने त्यांना २५ आॅगस्टला अटक करून प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली होती. आता मुनेश्वर २९ आॅगस्टपासून न्यायालयीन कोठडीत आहे.