शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा असुरक्षित प्रवास झाल्यास मुख्याध्यापकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:51 IST

जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील बसेसमध्ये वाहतूक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे आता सरळ मुख्याध्यापकांवरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

ठळक मुद्देआरटीओंनी काढले पत्र५ शाळांच्या मुख्याध्यापकांना दणका

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील बसेसमध्ये वाहतूक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. असे करणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येतोच. तरीही शाळा प्रशासन सुधारत नाही. त्यामुळे आता सरळ मुख्याध्यापकांवरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.घरापासून शाळेचे अंतर दूर असल्यास शाळेत जाण्यासाठी अनेक खासगी वाहनांचा वापर होत असतो. परंतु त्या वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसचा कधी परवाना नसतो. कधी मोटारवाहन कायद्याच्या नियमात असणाऱ्या सोयी सुविधा राहत नाही. भंगार गाड्यांना स्कूल बस म्हणून चालविले जाते. त्यामुळे त्या वाहनांनी विद्यार्थ्यांचा कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून होत असलेली वाहतूक थांबविण्यासाठी स्वत: मुख्याध्यापक-प्राचार्य यांनीच जबाबदारी स्वीकारावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद शिक्षण विभागाने करावी, असे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.या पत्राची माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक तथा जिल्हा स्कूल बस सुरक्षीतता समिती अध्यक्षांनाही दिली आहे. जिल्ह्यात अनेक कॉन्व्हेंट व शाळेत परवाना नसलेल्या वाहनांचा स्कूल बस म्हणून वापर करण्यात येतो. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नियोजन करीत आहे. परंतु या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करावे असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

२५ दिवसांत ५ मुख्याध्यापकांना दणकापरवाना नसताना बस मधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ५ शाळांच्या मुख्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ग्राम सरांडी येथील प्रगती हायस्कूल आश्रमशाळेतील बस क्रमांक एमएच ३१-बीबी २९२५ ला स्कूल बसची परवानगी नसताना १९ विद्यार्थ्यांची वाहतूक ३ जानेवारी रोजी करीत होते. रावणवाडी येथील दिल्ली पब्लीक स्कूलच्य बस क्रमांक एमएच ३५-पी २१३२ मध्ये एका विद्यार्थ्याची वाहतूक ५ जानेवारी केली जात होती. तिरोडा येथील असीम सराफ सेंट्रल अ‍ॅकेडमीच्या बस क्रमांक एमएच ३५-पी ०५७३ मध्ये २० विद्यार्थी बसवून १९ डिसेंबर रोजी वाहतूक केली जात होती. गोरेगाव येथील एम.सी.पी. स्कूलच्या बस क्रमांक एमएच ३५-ई १७७२ मध्ये २० डिसेंबर रोजी १५ विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. ग्राम मोगर्रा येथील जिल्हा परिषद स्कूलच्या बस क्रमांक एमएच ३५-एजी ०२४३ मध्ये ५० विद्यार्थी बसवून त्यांची वाहतूक केली जात होती. मोटार वाहन निरीक्षकांनी स्कूल बसची तपासणी केली असता त्यात ही बाब पुढे आली. त्यामुळे या ५ ही शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.परवाना नसतांना विद्यार्थ्यांचा प्रवास करविणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. या प्रकाराला मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास पुढे ते अशी चुकी करणारच नाहीत यासाठी कडक पवित्रा घेण्यात आला आहे.-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.

टॅग्स :Studentविद्यार्थी